Pune – ‘अनलॉक’ नंतरचा दुसरा दिवसही वाहतूक कोंडीचा

पुणे – राज्य शासनाने सात जून पासून टाळेबंदी 5 टप्प्यात उघडण्याचा निर्णय घेतला.  पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या प्रमुख शहरातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. पुणे शहरात सर्व दुकाने उघडली आहेत, तसेच हॉटेल, रेस्टॉरंट बार, जिम, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालये  50% क्षमतेने चालू ठेवण्याचा आदेश दिला आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे, परिणामी पुणेकरांसाठी ‘अनलॉक’ नंतरचा सलग दुसरा वाहतूक कोंडीचा ठरला आहे.

पुण्यात सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत उघडण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून बंद असलेली दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट बार, जिम हे पुन्हा सुरू झाले. त्यामुळे पुण्यातील नागरिकांनी खरेदीसाठी टिळक रोड, लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड या ठिकाणी प्रचंड गर्दी केली आहे. नोकरदार लोक ऑफिसला जायला बाहेर पडले त्यामुळे काल आणि आज पुणेकरांना प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. अनेक चौकात पोलीस अनुपस्थित होते त्यामुळे ट्रॅफिक चे नियोजन कोलमडले. त्यामुळे पुणेकरांनी टाळेबंदी तून सुटलो. पण वाहतूक कोंडीत अडकलो अश्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: