पिंपरी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर पुर्नवसन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

पिंपरी – नेहरूनगर येथील डॉ. आंबेडकर नगर या झोपडपट्टीमध्ये १९७२ पासून नागरिक राहात आहेत १३७ कुटुंब या ठिकाणी राहत असून २०१३ मध्ये येथील नागरिकांची फसवणूक करून आणि त्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेतल्या , आणि फसवणूक करून हा पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला,

नुकतेच संबंधित बिल्डरच्या वतीने बेकायदेशीरपणे ट्रांजेक्शन कॅम्प मध्ये हालवण्यासाठी आणि घर खाली करून घेण्यासाठी येथील रहिवाशांना जबरदस्ती करून बाळाचा घाट दाखवून दादागिरी करून हलवले जात आहे. येथील गोरगरीब रहिवासी कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या ठेकेदार मार्फत त्यांना कामवरून काढण्याची धमकी देऊनत्यांच्या जबरदस्तीने साह्य घेऊन येथील रहिवासी यांना घर खाली करण्यास भाग पाडले जात आहे,
गोर गरिबांवर दादागिरी दडपशाही करून हा प्रकल्प राबवला जात आहे , पुनर्वसन प्रकल्पास स्थानिक रहिवाशांची सहमती नाही यामुळे पुनर्वसन प्रकल्प रद्द करावा अशी मागणी कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केली,

यावेळी डॉ. आंबेडकर नगर समतीचे अध्यक्ष उमेश बनसोडे, अर्जुन गायकवाड, संमुख आईगोळे, बसवराज आईगोळे, परशुराम आइगोळे, संतोष पुजारी, इब्राहीम शेख, सिद्धू पुजारी सैपान शेख ,सुधीर सोनवणे , बादशहा शेख,राजेश आइगोळे, आदी उपस्थित होते ,

Leave a Reply

%d bloggers like this: