इंद्राणी बालन फाऊंडेशन तर्फे भारतीय सैन्य दलास ३० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’
पुणे,दि. 31 : पुनीत बालन यांच्या ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ कडून काश्मीर येथील भारतीय सैन्य दलास ३० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’ची मदत करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील उरी, त्रेघगाम, वेन, हाजीनार आणि बारामुल्ला येथील स्पेशल मुलांसाठी असलेल्या ५ ‘गुडविल स्कूल्स’ला मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलाच्या ‘चिनार कॉर्पस’ या विभागासोबत करार केला आहे. ‘नेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत हे मदतकार्य करण्यात आले आहे.
या बाबत बोलताना पुनीत बालन म्हणाले, महाराष्ट्रात सुरु असलेल्या मदत कार्याचा पुढचा टप्पा म्हणून काश्मीर खोऱ्यात पसरत असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ तर्फे देण्यात आलेल्या ३० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’ व्यतिरिक्त भारतीय सैन्य दल यांना ‘काश्मिरी आवाम’साठी जी वैद्यकीय मदत लागेल ती आमच्या संपूर्ण क्षमतेने करण्यासाठी एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी कटिबद्ध आहे.
