Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

लीला पुनावाला फाउंडेशन तर्फे सॅनिटायझर्सचे वाटप

पुणे, दि. 31 : कोविड -१९ महामारीमुळे दिवसोंदिवस स्वच्छतेचे महत्व सगळ्यांना नव्याने जाणवू लागले आहे. या पार्श्वभूमीवर लीला पुनावाला फाऊंडेशन ने २० हजारांहुन आधिक शाळा आणि धर्मदायी संस्थाना सॅनिटायझर्सचे वितरण केले आहे.

नुकतेच लीला पुनावाला फाउंडेशन ने ब्लॉसम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या  योगदानातुन पुणे शहरातील आणि पुणे शहर आणि आसपासच्या खेड्यांमधील चॅरिटेबल संस्था, रुग्णालये आणि अनाथाश्रमांमध्ये २०,२४० सॅनिटायझर्स बाटल्या देण्यात आल्या आहेत . यात एलपीएफ द्वारे विलो पुनावाला स्कूल / डॉ. सायरस पूनावाला स्कूल, सेंट क्लेरेस स्कूल, कॅम्प एज्युकेशन मराठी स्कूल, डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल, प्रीना स्कूल, अंजुमन स्कूल, बापूसाहेब पवार कन्या शाळा, गोल्डन ग्लेड्स स्कूल, कामशेत, हिरकणी मराठी स्कुल , गावडेवाडी, एमजी स्कूल, चांडोली झेडपी स्कूल, मंचर, प्राथमिक शाळा या शाळांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, साधू वासवानी मिशन, महात्मा गांधी अनाथाश्रम, बेल एअर हॉस्पिटल- पाचगणी, एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल, तेहमी ग्रँट नर्सिंग कॉलेज, मिलिटरी हॉस्पिटल, किर्की, आर्मी लिंब्स हॉस्पिटल आणि सिम्बायोसिस हॉस्पिटल मध्ये देखील सॅनिटायटरचे वितरण केले गेले. मागील वर्षी ज्या्ंचे उत्पनाचे स्त्रोत कमी झाले, ज्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईचा सामना करावा लागला अश्या कित्येक कुटुंबाना लीला पुनावाला फाउंडे्शनने मदत केलीआहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading