Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहरातील, सार्व. वहातूक सेवेतील चालकांना प्राधान्याने ‘लस’ देण्याची गोपाळदादा तिवारी यांची मागणी

पुणे – पुणे शहरातील, सार्व. वहातूक सेवेतील चालकांना प्राधान्याने ‘लस’ देण्याची मागणी कॉँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सोमवारी प्रशासनाकडे केली.  जेएम रोडवरील, डेक्कन रिक्षा स्टँडवर ‘रिक्षा चालकांना’ महाविकास आघाडी सरकार तर्फे दिल्या जाणाऱ्या रू१५००/- अनुदान नोंदणी कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते,

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे होते. ‘अनुदान-नोंदणी झालेल्यांना’ त्यांचे बँक खात्यात रक्कम लवकर जमा होईल, रिक्षा चालकांनी काँग्रेस भवन येथे संपर्क साधल्यास सहाय्य करू असे मा रमेश जी बागवे यांनी यावेळी सांगतीले.
या प्रसंगी अनेक रिक्षाचालकांना १५००/- अनुदान ॲानलाईन नोंदणी प्रमाण पत्र  रमेश बागवे व गोपाळदादा तिवारी यांचे हस्ते देण्यात आले.. या प्रसंगी बाळासाहेब बोडके, मनिष आनंद, अनिल पायगुडे, संदीप मोरे, ॲड फय्याज शेख, पृथ्वीराज पाटील, अमिर शेख(प्रदेशाध्यक्ष NSUI), भुषन रानभरे, सुरेश नांगरे, सुरेश कांबळे, महेंद्र पवार, भारत पवार, अविनाश बहिरट, रवि भोसले, आशिष गुंजाळ, सुभाष जेधे, सिध्दार्थ पारीटे, रोहित शिंदे, आलिम ईनामदार, रुतिक बामने, NSUI) इ काँग्रेस,एनएसयुआय व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी ऊपस्थित होते.. कार्यक्रमाचे आयोजक:-प्रसन्न संदीप मोरे(अध्यक्ष:-शिवाजीनगर विधानसभा NSUI) व सहकारी कार्यकर्त्यांनी केले..

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading