विलासरावांनी केलेले कार्य महाराष्ट्रातील जनता कधीही विसणार नाही – रमेश बागवे
पुणे – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारे नेते म्हणजे विलासराव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेसाठी, विद्यार्थ्यांसाठी केलेल्या योजना फार महत्वाच्या होत्या. घरेलू कामगारांचे महामंडळ, सावित्रीबाई फुले योजना, महिला बचत गटांना अल्पदरात कर्ज, विद्यार्थीनींना व महिला एम.एस.सी.आय.टी. शिक्षण अत्यंत कमी दरात देणे अशा विविध कल्याणकारी योजना त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत अमंलात आणल्या गेल्या. या योजनेमुळे महिलांना उद्योग व शिक्षण या क्षेत्रात अत्यंत सहकार्य झाले. पक्ष संघटनेत काम करीत असताना त्यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र करून पक्ष मजबूत करण्याचे काम केले. माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मंत्रीमंडळात मंत्री म्हणून कामाला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या कारकिर्दीत ते महत्वाच्या खात्यामध्ये मंत्री होते. बाबळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रिय अवजड मंत्री असा त्यांचा यशस्वी राजकीय प्रवास होता. अशा थोर नेत्यास मी विनम्र अभिवादन करतो.’’
कोरोनामुळे उपासमारीची वेळ आलेल्या अंध – अपंगांना मदतीचा हात म्हणून पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आशिष व्यवहारे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप केले. यावेळी बोलताना आशिष व्यवहारे म्हणाले की, ‘‘स्व. विलासरावजी देशमुख युवकांचे प्रेरणा स्थान होते. त्यांनी युवकांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणले आणि त्यामुळे आज अनेक माजी युवक पदाधिकारी पक्षाचे आमदार व मंत्री आहेत. या महान लोकनेत्याला माझा त्रिवार वंदन.’’
यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, विशाल मलके, वैष्णवी किराड, परवेज तांबोळी, शशांक पाटील, अभिजीत रोकडे, विठ्ठल गायकवाड, मुन्नाभाई शेख, सचिन सावंत, मीरा शिंदे, राहुल तायडे, रॉबर्ट डेव्हिड, अनिस खान, ज्ञानेश्र्वर निम्हण, देविदास लोणकर, किरण मात्रे, केतन जाधव, रूक्मिणी भिंगारकर, अविनाश सोळूंके आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
