Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

आनंदी जीवनासाठी गौतम बुद्धांच्या अष्टांग मार्गाचे अनुसरण करा- आमदार मुक्ता टिळक

पुणे : कोरोना काळात अनेकजण नैराश्याच्या गर्तेत आहेत. परंतु गौतम बुद्धांनी सांगितले चार सत्य आचरणात आणल्यास आपले जीवन आनंदी होईल. ती सत्य म्हणजे दु:ख असते दु:खाला कारण असते. दु:खाचे निवारण करता येते आणि दु:ख कमी करण्याचे उपाय आहेत. यासाठी गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितले होते. यम, नियम, आसन,  प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान,धारणा समाधी यावरून चालल्यास जीवन आनंदी होऊ शकते, असे प्रतिपादन आमदार मुक्ता टिळक यांनी केले.
आधार सोशल फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात भगवान गौतम बुध्द यांच्या २५६५ व्या जयंती निमित्त भगवान गुरुवार पेठेत तक्षशीला बुद्धविहार येथे गौतम बुध्द यांच्या प्रतीमेचे पूजन व त्रिशरण पंचशील सामूहिक पठण करण्यात आले. यावेळी रा.स्व.संघाचे कसबा भाग संघचालक अ‍ॅड. प्रशांत यादव, रवी अनासपुरे, विश्व हिंदू परिषद संघटनमंत्री उ.महाराष्ट्र किशोर चव्हाण, नगरसेवक अजय खेडेकर, सम्राट थोरात, लक्ष्मी हरीहर, प्रतिभा ढमाले, राणी कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक व फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे, राजेंद्र भोसले मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले.
प्रशांत यादव म्हणाले, आजच्या काळात माणूस वेगवेगळ्या कारणांमुळे दु:खी आहे. त्यातच कोरोनाच्या संक्रमणामुळे मोठे संकट कोसळले आहे. अशा वातावरणात गौतम बुद्धांचे विचार प्रेरणादायी ठरतात. परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारांतून मिळते.
यावेळी टिळक यांच्या हस्ते मास्क व सॅनिटाइजर वाटप करण्यात आले. कोरोना योद्ध्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. दिलीप काळोखे व अनिल काळोखे आणि आधार सोशल फाउंडेशन यांच्या वतीने गुरुवार पेठ परिसरात सॅनिटाइजेशन देखील करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading