भारत पे ने लॉन्च केले ‘कोविड वैक्सीनेशन कॅशबॅक’
पुणे: कोविड १९ विरुद्ध भारत सरकारच्या लसीकरण मोहीमेला आणखी बळकट करण्यासाठी व्यापाऱ्यांसाठी देशातील आघाडीच्या फिनटेक कंपन्यांपैकी नाविन्यपूर्ण उपक्रम जाहीर केला आहे.कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पांसिबिलिटी – ‘भारत पे केअर्स अंतर्गत सूरु करण्यात आलेली ही मोहीम कोविड १९ लसीकरणा बद्दल ६० दशलक्षाहुनही जास्त व्यापारी भागिदारांना जागरुक करने तसेच त्यांना विनाविलंब लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करणारा हा पहिलाच उपक्रम आहे.देशातील पहिल्या लसीकरण कॅशबॅक अंतर्गत, भारत पे चा व्यापाऱ्यांना भारत पे अॅपद्वारे त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र स्कॅन करून त्यांच्या बॅंक खात्यात ३०० रुपये त्वरीत कॅशबॅक मीळेल.
कोविड १९ लसीकरणा संदर्भात संबंधित माहिती पुरविण्यासाठी कंपनीने आपल्या अॅपवर कोविड १९ लस ट्रॅकर सुरू करण्याची घोषणा देखील केली आहे.या लसीकरण ट्रॅकरच्या मदतीने व्यापारी जवळच्या कोविड १९ लसीकरण केंद्राचा तपशील त्याचा स्थानानुसार पाहु शकतात.तसेच आपल्या निवडलेल्या केंद्रांवर स्लॉट उपलब्ध असतील तेव्हा अधिसूचना मीळवू शकता.
भारत पे चे को-फाउंडर आणि सीईओ अश्निर ग्रोवर मोहिमेबद्दल सविस्तर माहिती देताना म्हणाले की.”कोविड दरम्यान भारतातील दुकानदारांनी लोकांना आवश्यक वस्तू पुरवुन महत्त्व पुर्ण भुमिका निभावली.आता हळूहळू अनलाॅक सह काम करावे लागेल अशी वेळ आली आहे.त्यामुळे सर्व दुकानदारांना लवकरात लवकर लसीकरण करण्यास प्रोत्साहित करावे अशी भारत पे ची इच्छा आहे.जेनेकरुन येत्या काळात त्यांची दुकाने उघडली जातील.तसेच वाढी सोबत ते पुर्णपणे सुरक्षित राहतील आता व्यसाय सामान्य होईल.”
भारत पे छोटे देशभरातील किरकोळ व्यापारी आणि कीराणा दुकानदारांसाठी आर्थिक समावेशन प्रत्क्षात आनण्यास कटिबद्ध आहे.कंपनीला डिजिटल बॅंक बनविण्याची इच्छा आहे. आणि त्यांचा गरजा भागवू शकतील अशा व्यवसायांना सक्षम बनविण्यासाठी अनेक प्रकारच्या वित्तीय उत्पादनांची सुरूवात करुन देशातील दशलक्षाहुनही अधिक एसएमई समुदायाला सुरक्षित बनविण्यास उत्सुक आहे.
