Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लसीकरण वाढले तरच संपूर्ण लॉकडाऊन उठणार – अस्लम शेख

मुंबई – सध्या लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचे संकेत काही मंत्री देत आहेत. आता मुंबईचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी ५० टक्के लसीकरण झाले तरच लॉकडाऊन उठू शकतो असे मोठे विधान केले आहे. अस्लम शेख म्हणाले की, लॉकडाऊन सरकरट उघडला जाणार नाही, पण सर्वसामान्यांना दिलासा मात्र देण्यात येईल. तसेच हॉटेल, सलून, व्यावसायिक, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन उघडण्याबाबतचा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘जोपर्यंत राज्यासह मुंबईत लसीकरण ५० टक्क्यांच्या वर जात नाही तोपर्यंत लॉकडाऊन उठू शकत नाही. कारण हे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. लॉकडाऊन शिथिल करताना कोणती दुकाने उघडायची, कशी उघडायची? याबाबत विचार केला जाईल. तसेच एसी, कपडे, सलून, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांना आणि दुकानदारांना दिलासा मिळू शकतो. अत्यावश्यक सेवेतील दुकानांबाबतही सर्व विचार करण्यात येईल. याबाबत टास्क फोर्स विचारविनिमय करेल आणि त्यानंतर तशा हिशोबाने कॅबिनेटमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल,’ असे अस्लम शेख म्हणाले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading