Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

सोनाली कुलकर्णीच्या घरी चाहत्याचा राडा, झटापटीत वडील जखमी

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवडमधील घरी एका अज्ञात इसमाने जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला आहे. या इसमाने मी सोनालीचा चाहता असून, मला तुमच्या घरात राहू द्या, असं म्हणत घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी यांनी त्या अज्ञात व्यक्तीला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि या झटापटीत ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनतर त्यांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली होती. यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

असा हा धक्कादायक प्रकार पाहून सोनालीचं कुटुंब घाबरलं आहे. सोनालीने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. ती आपल्या पतीसोबत सध्या दुबईमध्ये आहे. तिच्या गैरहजेरीत अज्ञात इसमाने घरी येऊन हा सगळा गोंधळ घातला आहे. त्यामुळे सोनालीसुद्धा चिंतेत आहे.

कलाकारांचा विविध चाहत्यांशी संपर्क येत असतो. त्यांना हाताळता हाताळता त्यांच्या नाकी नऊ येत असतं. अनेक सामाजिक ठिकाणी त्यांना अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. त्यांना या सर्वांची सवयदेखील झालेली असते. मात्र थेट घरी येऊन अज्ञात इसमाने असा गोंधळ घातल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading