fbpx
Saturday, May 11, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यत सोमवारी 22 हजार 122 नविन रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आजही 30 हजारांच्या खाली राहिली. गेल्या 24 तासात राज्यात 22 हजार 122 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. नवीन रुग्णांच्या तुनलेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील रुग्णांची संख्या कमी होत असताना आज राज्यातील मृतांचा आकडा पाचशेच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या 24 तसात 42 हजार 320 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 51 लाख 82 हजार 592 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 लाख 02 हजार 019 इतकी झाली असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.9 टक्के इतके आहे.

आज राज्यात 361 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.59 टक्के आहे. राज्यत आजपर्यंत 89 हजार 212 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यामध्ये 3 लाख 27 हजार 058 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 32 लाख 77 हजार 290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56 लाख 02 हजार 019 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

पुणे अपडेट

  • दिवसभरात ४९४ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात १४१० रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ५५ रुग्णांचा मृत्यू. १९ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १०५९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६६११९.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ९७२४.
  • एकूण मृत्यू -८०४३.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४८३५२.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७५८२.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading