Saturday, May 30, 2026
Latest NewsTECHNOLOGY

वसंत वसंत लिमयेंच्या ‘लॉक ग्रिफिन’चा विस्तृत कॅनव्हास ‘ऑडिओबुक’मध्ये ‘स्टोरीटेल’वर!

‘लॉक ग्रिफिन’ ही वसंत वसंत लिमये यांची अत्यंत उत्कण्ठावर्धक रोमांचकारी कादंबरी आता ‘स्टोरीटेल’च्या लोकप्रिय ऑडिओबुक श्रेणीत स्वतः लेखक वसंत वसंत लिमये धीरगंभीर आवाजात प्रदर्शित होत आहे. मराठी साहित्यातील एक वेगळा नवा प्रवाह ठरलेली ही कादंबरी श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार असून ती रसिकांना ‘स्टोरीटेल’ने उपलब्ध करून दिली आहे.

आयआयटीमधून बीटेक पदवीधर असलेले लेखक वसंत वसंत लिमये यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय त्यांच्या नावापासूनच होतो. १९९१-९२ या कालावधीत लेखक वसंत वसंत लिमये अपघातानंच मुंबईच्या एका सायंदैनिकात ‘धुंद स्वच्छंद’ स्तंभ लिहून लेखनाकडे वळले. या लेखांवर आधारित १९९४ साली पाहिलं पुस्तक प्रकाशित झालं. त्यानंतर ‘लॉक ग्रिफिन’ ही त्यांची पहिली कादंबरी २०१२ ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केली. त्यानंतर त्यांच्या ‘कॅम्पफायर’, ‘विश्वस्त’ या कादंबऱ्याही ‘लॉक ग्रिफिन’ प्रमाणे भव्यदिव्य असल्याने लोकप्रिय ठरल्या आहेत.


‘लॉक ग्रिफिन’ एखाद्या इंग्रजी रहस्यमय कादंबरीप्रमाणे ही कादंबरी भारतातील अनेक राज्ये व अमेरिकेत फिरवून आणते. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील तीन पिढ्यांची गोष्ट सोबत एक राजकीय थ्रिलर आहे. एक वेगळ्या प्रकारचा अनोखा आणि आश्चर्यचकित करणारा आनंद ती देते. ‘लॉक ग्रिफिन’मध्ये सत्य घटनांवर आधारित एक विस्तृत कॅनव्हास रंगवला गेला आहे. लेखकाने यासाठी खुप संशोधन केले आहे. कादंबरीतील घटना, प्रसंग व व्यक्तिरेखांचा सखोल अभ्यास भौगोलिक व सांस्कृतिक इतिहास घटनांशी जोडल्याने कादंबरी प्रवाही बनली आहे. गढ़वाल, नैनीताल, वॉशिंग्टन, स्कॉटलैंड, ते पाचगनी, श्री क्षेत्र महुली, नाशिक, गोदाघाट या स्थळांचे अत्यंत ज्वलंत चित्रण ‘लॉक ग्रिफिन’मध्ये आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading