कोरोना – रविवारी राज्यात २६ हजार ६७२ नवीन रुग्ण
मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांची संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासात २६ हजार ६७२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २९ हजार १७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात गेल्या २४ तासात २९,१७७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५१,४०,२७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.१२% एवढे झाले आहे. तर राज्यात २६ हजार ६७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ५९४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३०,१३,५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,७९,८९७ (१६.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,९६,३०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,७७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,४८,३९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. नोंद झालेल्या एकूण ५९४ मृत्यूंपैकी ३९८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ७२६ ने वाढली आहे.
मुंबईत १ हजार ४३१ कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ४३१ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत एकुण ६ लाख ९७ हजार ८१० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार ४७० कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ६ लाख ५२ हजार ६८६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे तर २८ हजार ४१० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुबंईतील कोरोना मृताचीं एकुण संख्या ही १४ हजार ६२३ वर पोहोचली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात आतापर्यंत ६० लाख ७१ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या २४ तासात २३ हजार ३१४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
पुणे कोरोना अपडेट
- दिवसभरात 709 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात 2324 रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत 39 रुग्णांचा मृत्यू. 21 रूग्ण पुण्याबाहेरील.
- 1291 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 465625
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 10676
- एकूण मृत्यू – 8007
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 446942
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9066
