Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENTLatest News

लोमोटिफने केली #डान्स रीमिक्स’या नवीन चॅलेंजची घोषणा

उद्याची चिंता भिरकावून देत, आपल्या आवडत्या बॉलिवूड गाण्यावर आपण बेभान होऊन नाचतोय असा एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात यावा असे स्वप्न आपल्यातील प्रत्येकानेच कधी-ना-कधी पाहिलेले असते. आता वेळ आली आहे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची कारण लोमोटिफने जाहीर केले आहे आपले नवेकोरे #डान्स रीमिक्स चॅलेंज!यंदाच्या शुक्रवारपासून ते थेट १७ जूनपर्यंत चालू राहणा-या या चॅलेंजमध्ये देशभरातील डान्सर्सना आपले व्हिडिओज रिमिक्स करण्याची आणि आपल्या आवडत्या सेलिब्रेटींच्या सोबतीने नाचण्याची संधी मिळणार आहे, ज्यात त्यांना काही लोकप्रिय हूक स्टेप्स सादर करायच्या आहेत.

या चॅलेंजमधून क्षणार्धात सोशल मीडिया सेन्सेशन बनण्याची संधी तर मिळणार आहेच पण स्पर्धेतील सर्वाधिक लाइक्स मिळविणा-याटॉप 3 स्पर्धकांना अनुक्रमे रु. २ लाख, १ लाख आणि ५०,०००रुपयांचे रोख बक्षिसही जिंकता येणार आहे. तसेच या स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकाला या कॅम्पेनचा चेहरा असलेली अतिशय सुंदर आणि टॅलेन्टेड डान्सरशक्ती मोहन हिच्यासोबत संवाद साधण्यासाठी व्हर्च्युअल मीट अँड ग्रीट सेशनच्या माध्यमातून खास वेळही मिळणार आहे.

या चॅलेंजबद्दल अतिशय उत्सुक असलेली शक्ती मोहन सांगते, “मी बॉलिवूडची गाणी ऐकत आणि त्यांच्यावर नाचतच लहानाची मोठी झाले आहे. ही गाणी माझ्या आयुष्याचा, माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. माझ्याप्रमाणेच संपूर्ण देशभरातच या संगीताचे आणि नृत्याचे निस्सीम चाहते आहेत, ज्यांची पावले त्यांच्या आवडत्या गाण्यांवर थिरकली आहेत आणि त्यातल्या आयकॉनिक हूक स्टेप्सची त्यांनी हुबेहूब नक्कल केली आहे. लोमोटिफ #डान्स रीमिक्स  चॅलेंज म्हणजे स्वत:ला त्या अजरामर डान्स सीन्समध्ये स्वत: सहभागी होण्याची आणि आपल्या आवडत्या सेलिब्रेटींच्या सोबतीने नाचण्याची संधी देणारी स्पर्धा आहे. मी या चॅलेंजचा एक भाग आहे या गोष्टीचा मला आनंद आहे आणि नृत्याबद्दलचे आपले प्रेम जगासमोर आणण्यासाठी उत्सुक असणारे डान्सर्स व बॉलिवूड यांच्या एकत्र येण्यातली मौज अनुभवायला मी अत्यंत उत्सुक आहे. शिवाय या स्पर्धकांना मार्गदर्शन करणे, त्यांना सल्ला देणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचे परफॉर्मन्सेस अधिकच दर्जेदार होतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading