अवादा फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध जील्ह्यात खाद्यपदार्थ व शिधा वाटप
पुणे – भारताला वेढुन काढणारे मानवतावादी संकट हे अत्यंत त्रासदायक आहे.या कठीण काळात जेव्हा भारताला या भयंकर कोरोणा विषाणू साथीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे.तेव्हा आपल्या समाजातील रोजंदारी कामगारांसारख्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला,परप्रांतीय कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत आहे.
अवादा फाऊंडेशन-अवादा ग्रुप ऑफ कंपनीज ची परोपकारी संस्था रोजंदारी कामगारांना आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना खाद्यपदार्थांची पाकीटे आणि शिधा पोहचविण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे.सध्याचा तीव्र करोणा विषाणू साथीच्या आजारामुळे कोट्यावधी मध्यम वर्गीय लोकांना अन्नधान्याच्या अनिश्चिततेचे तीव्र संकट ओढावले आहे.हे बघत असताना अवादा फाऊंडेशन आपल्या मदतीसाठी मोठ्या विस्ताराची घोषणा केली आहे.
अवादा फाऊंडेशन ही महाराष्ट्रातील अमरावती सोलापूर बुलढाणा आणि सातारा येथे खाद्यपदार्थ पॅकेट्स चे वितरण करीत आहेत.वाढत्या उपासमारीला लक्षात घेऊन, अवादा फाऊंडेशन वितरण करीत असलेल्या खाद्य पॅकेट्स ची संख्या वाढविण्यासाठी त्याचा आवाक्यामध्ये भरीव विस्तार करण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन स्विकारत आहे.सद्ययस्थितीत अवादा फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी खाद्यपदार्थांचे पाकिटे वितरीत केली जात आहे.
यावेळी अवादा ग्रुपचे चेअरमन विनित मीत्तल म्हणाले “भारतात प्रत्येकास लसीकरण होईपर्यंत अन्न हे सर्वोत्तम औषध आहे.अन्नासारख्या अत्यावश्यक गोष्टींचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर आणि कुपोषण वाढण्याची शक्यता आहे.माझ्या मते,आपण सर्व आपल्या देशाचे ॠणी आहोत.प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात राष्ट्राप्रतीचे हे देणं फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यावर महाराष्ट्रात असलेले प्रेम, समृद्धि आणि विकासाचे मोठे कर्ज आपण परतफेड केले पाहिजे.मला आशा आहे की, आमच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती सुधारेल.”
खाद्य पॅकेट्स व्यतिरिक्त, अवादा फाऊंडेशनने राजस्थान आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ३०० खाट असलेले ४ रुग्णालये ,प्राणवायू संयंत्र तयार करण्यासाठी तसेच व्हेन्टीलेटर , आणि आॅक्सीजन सिलिंडर आणि आॅक्सीजन सिलिंडर केंद्र देण्याचा पुढाकार घेतला आहे.या व्यतीरिक्त ,अवादा फाऊंडेशन गुजरातच्या सुंदरनगर जिल्ह्यातील तळसाना गावात एक ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करण्यासाठी प्रथोमउपचार केंद्र स्थापित करण्यात मदत करीत आहे.सध्याचा आरोग्य केंद्राचे सुधारिकीकरण करून आयसीयु वार्ड तयार करण्यासाठी आम्ही सर्व आधुनिक सुविधांसह सुधारित आहे.जसे आयसीयु बेड्स,सलाईन स्टॅंड,मेडिसीन ट्रे इत्यादी.
