Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

येरवडा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरचे खासदार संजय राऊत व डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान बालके मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. उपाययोजना म्हणून महापालिकेच्या वतीने येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लवकरच बालकांसाठी विशेष कोवीड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर येरवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाच्या आवारात सुरू करण्यात येणाऱ्या कोवीड सेंटरच्या माध्यमातून कोवीड रुग्णांसह बालकांना चांगले उपचार मिळतील अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

येरवडा येथील डॉ. आंबेडकर कोवीड सेंटर च्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार ऑनलाइन सहभागी झाले होते, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारी सह लसीकरणासाठी शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. पुणे महापालिकेसोबत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुणेकर नागरिकांसाठी कोवीड सेंटर सुरु करणे ही कौतुकाची बाब असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी नमूद केले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाला शिवसेना नेते संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, बाळासाहेब कदम, उपमहापौर सुनिता वाडेकर, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक संजय भोसले, नगरसेविका श्वेता चव्हाण, शहर प्रमुख संजय मोरे, माजी नगरसेवक सागर माळकर, जानु आखाडे, संयोजक नगरसेवक अविनाश साळवे, सिवायडीए संस्थेचे संचालक मॅथ्यू मॅटम उपस्थित होते.

या कोवीड सेंटरमध्ये 130 बेड विलगीकरण रुग्णांसाठी, बालकांसाठी विशेष कक्ष असून त्यातील 10 बेड ऑक्सिजन सहा तर इतर चाळीस बेड बालकांसाठी उपलब्ध असणार आहेत. वीस बेड ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील अशी 200 कोवीड रुग्णांची पूर्णवेळ उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. एक्स रे व लॅब तपासणी सह 24 तास रुग्णवाहिका व डॉक्टर सेवा उपलब्ध राहणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading