पुणे शहर व जिल्हा काँग्रेस व राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन
पुणे – पुणे शहर व जिल्हा काँग्रेस व “राजीव गांधी स्मारक समिती”, पुणे यांच्या वतीने शुक्रवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हाघ्यक्ष, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, महीला अध्यक्षा सोनाली मारणे, राजीव गांधी स्मारक समिती संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, अभिनव शिक्षण संस्थेचे अघ्यक्ष राजीव जगताप, ब्लाॅक अघ्यक्ष, किशोर रायकर, रमेश सोनकांबळे, संग्राम मोहोळ, महेश बापू ढमढेरे, शहर काँग्रेस ऊपाध्यक्ष सुर्यकांत मारणे, लक्ष्मण आबा तरवडे, पृथ्वीराज पाटील, जेष्ठ पत्रकार व समिती सदस्य अविनाश गोडबोले, आबा जगताप, संजय अभंग, सेवादल प्रमूख हरिदास अडसूळ, घनःश्याम निम्हण, महेशअंबिके, नर्सिंह अंदोली, इ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्स्फूर्त ऊपस्थित होते. आभार समिती सदस्य सुर्यकांत मारणे यांनी मानले..