Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात मंगळवारी २८ हजार ४३८ नवीन रुग्ण; ६७९ जणांचा मृत्यू

मुंबई – गेल्या २४ तासात राज्यात २८ हजार ४३८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६७९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस चढउतार होताना दिसत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

राज्यात गेल्या २४ तासात २८ हजार ४३८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आज ५२,८९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४९,२७,४८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.६९% एवढे झाले आहे. राज्यात आज ६७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ४ लाख १९ हजार ७२७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी १५लाख ८८ हजार ७१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ३३ हजार ५०६ (१७.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,९७,१६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,००४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात २८,४३८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५४,३३,५०६ झाली आहे. नोंद झालेल्या एकूण ६७९ मृत्यूंपैकी ४२२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ६१२ ने वाढली आहे.

पुणे शहर अपडेट

  • दिवसभरात १०२१ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात २८९२ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ६८ रुग्णांचा मृत्यू. २२ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३६४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३६६९०.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १६५२३.
  • एकूण मृत्यू -९२५८.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४३६६९०.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७८९५.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading