Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

ज्येष्ठ हास्यकवी बंडा जोशी यांना रंगत- संगत प्रतिष्ठानचा काव्य – गाैरव पुरस्कार जाहीर

पुणेः- रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा काव्य-गाैरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ हास्यकवी आणि विडंबनकार बंडा जोशी यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ वात्रटीकाकार आणि व्याख्याते रामदास फुटाणे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार करोना संबंधीत शासनाचे सर्व नियम पाळून गुरुवारी सकाळी १० वाजता छोटेखानी समारंभात बंडा जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे. सन्मानचिन्ह, ग्रंथ,शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारचे स्वरुप आहे. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ ज्येष्ठ हास्यकवी आणि विडंबनकार बंडा जोशी यांची हास्यकवीतेच्या क्षेत्रात मुशाफिरी सुरु आहे. यापूर्वी सरिता पत्की, विठ्ठल वाघ, रमण रणदिवे, अरुण म्हात्रे, हेमा लेले, अश्विनी धोंगडे, आसावरी काकडे इत्यादींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading