Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – शनिवारी राज्यात ३४ हजार ८४८ नवीन रुग्ण; ९६० जणांचा मृत्यू

मुंबई – राज्यात ३४ हजार ८४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर शनिवारी राज्यात ९६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असताना राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आज राज्यात ५९ हजार ०७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४७,६७,०५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२० टक्के एवढे झाले आहे.

शनिवारी राज्यात ३४ हजार ८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ४४ हजार ०६३ वर पोहोचली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख ९४ हजार ०३२ झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०८,३९,४०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,४४,०६३ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,४७,६५३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २८,७२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे शहर अपडेट्स

  • दिवसभरात १६९३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ३०३३ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ७२ रुग्णांचा मृत्यू. २४ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १४१३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५७९८६.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२३०४.
  • एकूण मृत्यू -७६५९.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४२८०२३.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२४०९.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading