Tuesday, June 16, 2026
PUNE

छत्रपती संभाजी महाराजांना पतित पावन संघटनेतर्फे वंदन

पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६४ व्या जयंती निमित्त पतित पावन संघटना पुणे शहरतर्फे डेक्कन येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
त्यावेळी राजाभाऊ पाटील, स्वप्नील नाईक, दिनेश भिलारे,यादव पुजारी व योगेश वाडेकर हे उपस्थित होते.
स्वप्नील नाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. त्यांच्या नावाचा केवळ जयजयकार न करता, त्यांच्याप्रमाणे कार्य करण्याकरीता आपण पुढे यायला हवे. नव्या पिढीला संभाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा आपण सांगायला हव्या, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading