ऑनलाईन राज्यस्तरीय वुशू स्पर्धा १५ आणि १६ मे रोजी
पुणे : महाराष्ट्र राज्य वुशू संघटनेच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा वुशू असोसिएशन च्या वतीने १५ आणि १६ मे रोजी राज्यस्तरीय ट्रॅडिशनल वुशू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमधून नॅशनल आॅनलाईन ट्रॅडिशनल वुशू स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे. अशी माहिती आॅल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव सोपान कटके यांनी दिली.
राष्ट्रीय आॅनलाईन ट्रॅडिशनल वुशू स्पर्धेतून आशियाई आॅनलाईन ट्रॅडिशनल वुशू स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडला जाणार असल्याने राज्यस्तरीय वुशू स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. ताऊलू, ननक्वॉन, ताईचीक्वॉन आणि इतर प्रकारात इव्ेहंटस होणार आहेत. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू सहभागी होणार आहेत.
कोव्हिड संदर्भातील सर्व नियम पाळून घरातील टेरेस किवा अंगणात कौशल्य सादरीकरण करायचे आहे. सहभागी आणि विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.
सिनिअर, ज्युनिअर,सबज्युनिअर गटात स्पर्धा होणार आहे. संदीप शेलार, निलेश वाळींबे, गजानन पवार, प्रतिक्षा शिंदे पंच म्हणून काम पाहणार आहेत.
