fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात शुक्रवारी ३९ हजार ९२३ नवीन रुग्ण, ६९५ मृत्यू

मुंबई – राज्यात शुक्रवारी ३९ हजार ९२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ९ हजार २१५ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख १९ हजार २५४ वर पोहोचली आहे. तसेच आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी मृतांच्या आकड्यातही घट झालेली दिसली. गुरुवारी ७९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता, तर शुक्रवारी ६९५ मृतांची नोंद झाली.

राज्यात आज ६९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ७९ हजार ५५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५० टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०६,०२,१४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,०९,२१५ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,८२,४२५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २८,३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा कमी होत असतानाच राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहे. आज ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४७,०७,९८० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्के एवढे झाले आहे.

पुणे शहर अपटेड

  • दिवसभरात १८३६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ३३१८ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ७२ रुग्णांचा मृत्यू. २४ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३८१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५६२९३.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३६९२
  • एकूण मृत्यू -७६११.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४२४९९०.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १३९०८.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading