Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नाना पटोलेंसह त्यांच्या तीन निकटवरतीयांचे फोन टॅप

मुंबई , दि. १४ :  पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचं प्रकरण गाजत आहे. यामध्ये आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह त्यांच्या तीन निकटवरतीयांचे फोन टॅपिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पाटोले त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार होते. राज्यातील इतर नेत्यांचे फोन टॅपिंग होत असताना परवानगी न घेता फोन टॅपिंग केले होते मात्र नाना पटोले यांचा फोन बनावट नावाची परवानगी घेवून टॅप  करण्यात आला आहे.  अमली पदार्थांची तस्करी करत असल्याच्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी ही परवानगी मागण्यात आली होती. त्यात नाव वेगळी मात्र मोबाईल नंबर नाना पटोले आणि त्यांच्या निकटवर्ती यांचा असल्याचं समोर आलं आहे.

नाना पटोले म्हणाले की, या प्रकरणाची योग्य चौकशी केली जावी, तसेच संबंधितांवर कठोर करवाई करावी. इतरही बऱ्याच मोठ्या नेत्यांचे फोन टॅप होत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येऊन चालणार नाही. जो याला जबाबदार आहे त्यावर कारवाई करावी, असं पटोलेंनी म्हटलं आहे.

नाना पटोले यांचा अमजद खान नावाने फोन टॅप केला. 13 नोव्हेंबर 2017 आणि 18 सप्टेंबर 2017 यावेळी टॅप करण्यात आला. मदन मोहन लालजी चांडक मार्केट गोशाला रोड गोंदिया हा पत्ता वापरण्यात आला. इम्तियाज रफिक शेख नावाने उमेश डांगे यांचा फोन टॅप करण्यात आला. उमेश डांगे हे नाना पटोले यांचे निकटवर्तीय आहेत. हा फोन 18 सप्टेंबर 2017 मध्ये टॅप करण्यात आला. सरफराज खान नावाने अभिषेक देशपांडे यांचा फोन टॅप करण्यात आला.  अभिषेक देशपांडे हे आर्किटेक्चर आहेत आणि नाना पटोले यांचे निकटवर्तीय आहेत. 2 नोव्हेंबर 2017 रोजी हा फोन टॅप करण्यात आला. विवेकानंद नगर, नागपूर हा पत्ता असल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading