Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

मंडईजवळील स्वामी समर्थ मठात ५५१ आंब्यांची आरास

पुणे : मंडईजवळील रामेश्वर चौकातील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थानच्या श्री स्वामी समर्थ मठात अक्षयतृतीयेनिमित्त ५५१ आंब्यांची आरास करण्यात आली. हिरव्या रंगांचे प्रवेशद्वार आणि संपूर्ण गाभा-यात आंब्यांची व पानांची आरास असे मनोहारी दृश्य मठात पहायला मिळाले. 

यावेळी संस्थानचे गजानन जेधे, संदीप होनराव, रवींद्र शेडगे आदी उपस्थित होते. दरवर्षी अक्षयतृतीयेला आंब्याची सजावट केली जाते. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. मात्र, यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर मठ बंद असल्याने भाविकांनी आॅनलाईन पद्धतीने दर्शन घेतले. 
कमलेश कामठे म्हणाले, आंब्यांची आरास करुन दुस-या दिवशी हा आंब्याचा प्रसाद मठाबाहेर भाविकांना देण्यात येतो. कोविडच्या पार्श्वभूमीवर मठ बंद असला, तरी देखील सजावटीकरीता वापरलेले आंबे प्रसाद म्हणून मठाबाहेर देण्यात येणार आहेत. अक्षयतृतीयेनिमित्त मठातील सेवेक-यांनी ही आरास साकारण्यासोबतच मंदिरात जप देखील केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading