Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भूमी अभिलेखचा निवृत्त उपसंचालक वानखेडेकडे ८८ लाखांची बेहिशोबी संपत्ती; पत्नीसह दोघांवर गुन्हा

पुणे, दि. १४ – भूमी अभिलेख विभागाचे निवृत्त उपसंचालक बाळासाहेब वानखेडे (वय ५८) व त्यांच्या पत्नीच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे याच्याकडे ८८ लाख ८५ हजार रूपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे.

वकिलामार्फत एक कोटी ७० लाख रूपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात भुमी अभिलेख विभागाचे उपसंचालक असताना बाळासाहेब वानखेडे याला अटक केली होती. त्यानंतर वानखेडेच्या मालमत्तेची उघड चौकशी केली जात होती. या चौकशीत १९८९ ते २०१९ या दरम्यान वानखेडेकडे उत्पनापेक्षा ८८ लाख ८५ हजार रूपयांची मालमत्ता जास्त असल्याचे आढळून आले. त्यानुसार वानखडे व त्याची पत्नी उषाकिरण बाळासाहेब वानखेडे (वय ५४) याच्या विरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे हा सध्या सेवानिवृत्त आहे. त्याच्या व कुटुंबियांच्या नावे असलेल्या पुणे शहर, मुंबई, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील मालमत्ता व घरांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्याची प्रक्रिया सूरू आहे. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विजयमाला पवार या अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading