Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रवादीचे अपयश झाकण्यासाठी प्रशांत जगताप यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका – संदीप खर्डेकर

पुणे, दि. ११: राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेली टीका ही स्वतः चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी आणि कोरोना काळातील राष्ट्रवादीचे अपयश झाकण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली.

याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात खर्डेकर यांनीं म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात दिसलेच नाहीत हे पुणेकरांनी बघितले आहे.किंबहुना पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर पालक मंत्री महोदयांना जाग आली आणि त्यांनी पुण्यात बैठका घ्यायला सुरुवात केली.

कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कोरोना काळातील अफाट सेवा कार्य याचे मूल्यमापन घरात बसून केवळ टीका आणि प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणाऱ्यांना समजणें अवघडच. चंद्रकांत पाटील यांनी मागील वर्षभरात केलेल्या कार्याचा लेखाजोखा या पत्रकात खर्डेकर यांनी मांडला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading