Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENTLatest News

चित्रीकरणा दरम्यान मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

 मराठी चित्रपट, मालिका यासह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. झी मराठीवरील “आगबाई सुनबाई” या मालिकेच्या चित्रीकरणांसाठी  ते सध्या गोव्यामध्ये आहेत. याच चित्रीकरणा दरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली  आहे. त्यामुळे ते गोव्याच्या एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन आहेत. विशेष म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेऊन सुद्धा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अगंबाई सूनबाई मालिकेच्या सेटवरील इतर चार सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये दोन लाईटमॅन, आर्ट डिपार्टमेंटमधील एक व्यक्ती आणि एक ड्राइव्हर यांचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading