बदामांसह साजरा करूया आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन!
दरवर्षी १५ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा या दिनासाठी ‘नवीन तंत्रज्ञानांचा कुटुंबांच्या आरोग्यावर होणारा परिणाम’ ही थीम ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपण आपल्या कुटुंबांच्या आरोग्य व स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. याची चांगली सुरूवात म्हणजे योग्य आहाराची निवड करणे. बदामांसारख्या नट्समध्ये जीवनसत्त्व ई, मॅग्नेशियम, प्रथिन, रायबोफ्लेविन, झिंक इत्यादींसारखे १५ पौष्टिक घटक असतात. बदाम अनेक आरोग्यविषयक लाभ देण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे यंदा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिना एकतेचा आनंद घेण्यासोबत बदामांच्या सेवनासह साजरा करूया. यावर मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
अभिनेत्री सोहा अली खान म्हणाली , ”कोरोना महामारीचा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम झाला आहे. आई म्हणून मी माझ्या कुटुंबाच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासोबत त्यामध्ये सुधारणा करणे हे महत्त्वाचे आहे. माझा पहिला सल्ला आहे की, स्वत:च्या व कुटुंबाच्या रोजच्या आहारामध्ये बदामांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा.स्वत:च्या व कुटुंबाच्या रोजच्या आहारामध्ये बदामांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. आहार पौष्टिक व संपन्न असण्याव्यतिरिक्त नियमितपणे बदामांचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्याला देखील मदत होऊ शकते.
दिल्ली येथील मॅक्स हेल्थकेअरच्या डायटेटिक्स विभागाच्या प्रादेशिक प्रमुख रितिका समाद्दार म्हणाल्या, ”गेल्या वर्षभरापासून कुटुंबांना अधिक प्रमाणात या संकटाच्या परिणामाचा सामना करावा लागला आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आजारी पडण्यापासून संरक्षण, मुलांची काळजी आणि सोबतच काम करत राहण्याच्या अनेक जबाबदा-या त्यांच्यावर पडल्या आहेत. कुटुंबांनी पौष्टिक आहाराचे सेवन करणे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आवश्यक आहे. लहान, पण प्रभावी परिवर्तन म्हणजे तुमच्या स्वत:च्या व कुटुंबाच्या आहारामधून अनारोग्यकारक स्नॅक्सचे सेवन दूर करणे. बदाम भूकेचे शमन करतात आणि ऊर्जा देखील देतात. ”
पिलेट्स तज्ञ आणि आहार व पोषण सल्लागार माधुरी रूईयाम्हणाल्या, ”माझ्या मते, कुटुंबांनी त्यांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. व्यस्त काम करणा-या, तसेच कुटुंबाची काळजी घेणा-या पालकांनी योग्य आहार सेवन करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. तुम्ही कुटुंबाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून बदामांची निवड करू शकता. संशोधनातून निदर्शनास येते की, बदाम रक्तातील शर्करा पातळ्या आरोग्यदायी ठेवण्यामध्ये मदत करू शकतात आणि भोजनासोबत सेवन केले जाणा-या कर्बोदकांचा रक्तातील शर्करेवर होणारा परिणाम कमी करू शकतात. ही बाब मधुमेह असलेल्या व नसलेल्या अशा दोन्ही व्यक्तींसाठी महत्त्वाची ठरू शकते.
पोषण व स्वास्थ्य सल्लागार शीला कृष्णास्वामी म्हणाल्या, ”आजच्या व्यस्त जीवनशैलीदम्यान वृद्धांपासून तरूणांपर्यंत कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. सोईस्कर, पण आरोग्यदायी पर्याय म्हणजे कुटुंबाच्या रोजच्या आहारामध्ये बदामांची भर करा, यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येतील. संशोधन निदर्शनास आणते की, बदाम भारतामध्ये टाइप २ मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत असलेल्या रक्तातील शर्करा पातळ्या नियंत्रित ठेवण्यामध्ये मदत करू शकतात.”
फिटनेस तज्ञ आणि सेलिब्रिटी मास्टर इन्स्ट्रक्टर यास्मीन कराचीवालाम्हणाल्या, ” आपले जीवन कितीही व्यस्त असले तरी फिटनेस आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत कोणतीच तडजोड करू नये. पालक म्हणून आपल्या मुलाच्या दैनंदिन आहाराची बारकाईने काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. बदामांसारखे नट्स अनारोग्यकारक स्नॅक्ससाठी उत्तम आरोग्यदायी पर्याय आहे. बदामांमध्ये भूकेचे शमन करण्याचा गुण आहे, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. बदामांचे सेवन केल्यास मुलांना भोजनांदरम्यान पोट भरल्यासारखे वाटते व त्यामुळे तळलेले, अनारोग्यकारक स्नॅक्सचे सेवन करण्याचे प्रमाण कमी होण्यामध्ये मदत होईल.”
