fbpx
Friday, April 19, 2024
BusinessLatest NewsTOP NEWS

होंडा इंडिया फाउंडेशनतर्फे कोविड-19 लढ्यासाठी नवी मदत जाहीर

नवी दिल्ली, दि. 10 : होंडा इंडिया फाउंडेशन या होंडा समूह कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) विभागाने आज कोविड- 19 विरोधातील लढ्यात भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी नवी मदत जाहीर केली. फाउंडेशन हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथील राज्य सरकारबरोबर काम करत असून मदत कार्याच्या या टप्प्यासाठी 65 दशलक्ष रुपयांचा निधी देण्याचे ठरवले आहे.

होंडा इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेने आपल्या सर्वांना मोठा फटका बसला आहे. आपण ज्या समाजात काम करतो, त्या समाजासाठी आणि एकंदरीतच त्या देशासाठी सर्वोत्तम योगदान देणे अतिशय आवश्यक आहे. याकरीता अधिकाधिक व्यक्तींनी व संस्थांनी पुढे येऊन या कार्यात सहभागी व्हायला हवे. सरकार आणि उद्योगक्षेत्रांच्या या कामांमुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी कित्येक कुटुंबांना मदत होईल. प्रत्यक्षातील मदत कार्य सुरळीत चालावे यासाठी आम्ही वेगवेगळ्या घटकांबरोबर काम करत आहोत. ही वेळ आपण या संकटातून नक्की बाहेर पडू या ठाम आत्मविश्वासह एकमेकांना साथ देण्याची आहे.’

या मदतीचा एक भाग म्हणून फाउंडेशन तात्पुरते कोविड केयर विलगीकरण केंद्र आणि ऑक्सिजन निर्मिती प्लांट्सची स्थापना करणार आहे. मानेसर, हरियाणा येथे होंडाच्या वेयरहाउसमधे 100 बेड्सची सुविधा उभारली जात असून तापूकारा, राजस्थान येथील सरकारी कन्याशाळेत 50- 100 बेड्सची सुविधा सुरू केली जात आहे. ही तात्पुरती कोविड-19 केयर केंद्रे पुढील आठवड्यात कार्यान्वित होतील. कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातही अशाच प्रकारची विलगीकरण केंद्रे उभारण्याची योजना आहे.

फाउंडेशन कोलार जिल्हा (कर्नाटक), गौतमबुद्ध नगर (उत्तर प्रदेश) आणि मानेसर (हरियाणा) येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स सुरू करण्यासाठी राज्य सरकारबरोबर काम करत आहे. होंडा इंडिया फाउंडेशनने यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर वाटप उपक्रम हाती घेतले असून फ्रंट लाइन वॉरियर्सना जीवरक्षक किट्स (पीपीई, मास्क, सॅनिटायझर्स) आणि अन्न वाटपातून 5 राज्यांतील स्थानिक प्रशासनाला मदत केली आहे. ग्रामीण भागातील सरकारी हॉस्पिटल्सना पल्स ऑक्सिमीटर, थर्मोमीटर्स, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स अशा वैद्यकीय उपकरणांच्या स्वरुपात मदत केली जात आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading