Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन

पुणे, दि. १० : जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे आज सकाळी सदाशिवपेठ येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.

संभाजीराव काकडे हे लाला नावाने परिचित होते. शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख होती.  ते १९७७ व १९८५ साली बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. जनता पक्ष आणि समाजवादी चळचळीच्या माध्यमातून त्यांनी काम केले.  पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना व तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते.

श्रद्धांजली 

“संभाजीराव काकडे यांनी शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या उन्नतीसाठी जीवनभर काम केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. राजकारण, समाजकारण, सहकार अशा समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणारं ध्येयवादी, तत्वनिष्ठ नेतृत्वं म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांचं निधन ही पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे.”

-अजित पवार (उपमुख्यमंत्री)

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading