सोनालिका ने कर्मचारी वर्गाला १०० टक्के सुरक्षित करण्यासाठी लसीकरण मोहिम सुरु
पुणे ,दि. ६ – कोरानाविषाणूच्या नवीन व घातक लाटेने पुन्हा एकदा समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी अवघड काळ आणला आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा देशभरात कोविड-१९ महामारीची लाट आल्यानंतर केलेल्या कार्याप्रमाणेच सोनालिका ट्रॅक्टर्स पुन्हा २०२१ मध्ये त्यांचे कर्मचारी, चॅनेल भागीदार व स्टाफचे महामारीपासून पूर्णपणे संरक्षण करण्यासाठी त्यांना साह्य करण्यामध्ये अग्रस्थानी राहिली आहे. एक जबाबदार कॉर्पोरेट कंपनी म्हणून सोनालिका ट्रॅक्टर्सने त्यांच्या कामगारांसह भारतभरातील त्यांचे कर्मचारी, चॅनेल भागीदार व त्यांच्या टीम्सचा कोविड-१९ लसीकरणाचा खर्च उचलण्याची आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोनालिका ट्रॅक्टर्स त्यांच्या समूहाचे महामारीपासून संरक्षण करण्याला प्राधान्य देण्यासोबत भारताला कोविड-१९ आव्हानाविरोधातील लढ्यामध्ये साह्य देखील करत आहे.
सोनालिका ट्रॅक्टर्सने एप्रिल २१ मध्ये त्यांच्या होशियारपूर केंद्रामध्ये ५,४०० हून अधिक लसींची व्यवस्था केली आहे. सोनालिकाचे १०० टक्के कर्मचारी व चॅनेल भागीदारांसोबत त्यांच्या टीम्सचे संपूर्ण लसीकरण मे 20२१ पर्यंत त्यांच्या भारतभरातील कारखान्यांमध्ये लसीकरण मोहिम सुरू राहिल. तसेच सोनालिकाच्या टीम्स जगभरातील शेतक-यांसाठी दर्जेदार उत्पादने विकसित करण्याशी आणि त्यांना आमच्या प्रगत तंत्रज्ञानाने युक्त उत्पादनांचा अधिकतम लाभ घेण्यासाठी आमच्या उच्च दर्जाच्या सेवांसह साह्य करण्याशी कटिबद्ध आहेत. सोनालिकाने एप्रिल २१ मध्ये एकूण ९,१३० ट्रॅक्टर्सची विक्री केली आहे आणि प्रचंड ८५१ टक्क्यांची स्थानिक वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे त्यांनी लक्षणीय फरकाने उद्योगक्षेत्राच्या ४३६ टक्क्यांच्या वाढीला मागे टाकले आहे.
सध्या असलेल्या अवघड स्थितींबाबत बोलताना सोनालिका ग्रुपचे कार्यकारी संचालक रमण मित्तल म्हणाले, भारत त्याच्या इतिहासातील सर्वात गंभीर काळाचा सामना करत आहे आणि हीच वेळ आहे, जेथे आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाला पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यास पुढाकार घेतला पाहिजे. आज, प्रत्येकाचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. लसीकरणामुळे सध्याच्या आव्हानात्मक स्थितीविरोधातील लढा जिंकण्यामध्ये मदत होईल आणि आज विक्री दुय्यम घटक बनली आहे.
