fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघाचा स्तुत्य उपक्रम

कोरोनाच्या संकटकाळात कामगार व अपंगांना दिला मदतीचा हात

पिंपरी –  कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या गरजू कष्टकरी कुटुंबांची उपासमार होत आहे. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून अशा घटकांना मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या प्रयत्नातून मोफत अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.       

कोरोनाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने टाळाबंदीचा निर्णय घेतला आहे. या टाळेबंदीचा नियम पाळत असताना अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हे लक्षात घेऊन अरुण पवार यांच्यावतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनाचे औचित्य साधत 130 कामगार व अपंग यांना मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये गहू, तांदूळ, साखर, तेल, मीठ, शेंगदाणे, पोहे असे १५ दिवस पुरेल एवढे किराणा साहित्य देण्यात आले. हे साहित्य पिंपळे गुरव याठिकाणी मराठवाडा जनसेवक संघाच्या कार्यालयात कोरोना संबंधीचे सर्व नियम व सोशल डीस्टंन्सिंग ठेवून सानिटायझर, मास्क देवून किराणा किटचे वाटप करण्यात आले. मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार,  समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे अध्यक्ष अण्णा जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते किशोर अटरगेकर, मोहन पाल, हरिश्चंद्र सरडे, मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.         यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी अनेक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते अशा कार्यक्रमांचे आयोजन करतील व आपल्या कष्टकरी बांधवांना मदतीचा हात पुढे करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.          

अण्णा जोगदंड बोलताना म्हणाले, आज कोरोना आजारात नातेवाईकांना आपल्या रुग्णांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहता येत नाही. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी वाढलेला मृत्यूदर चिंताजनक आहे. ही वेळ आपणा सर्वांना मिळून घालवावी लागेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading