fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

एलएसएटी-इंडिया ची परीक्षा २९ मे २०२१ पासून सुरु होणार

पुणे, दि. २८  –  सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे एलएसएसी ग्लोबलने २०२१ सालची जून महिन्यात होणार असलेली एलएसएटी – इंडिया ही परीक्षा २९ मे २०२१ पासून वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये घेण्याचे ठरवले असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षेच्या तारखेमध्ये बदल केला गेल्यामुळे एलएसएटी – इंडियासाठीची नोंदणी १४ मे २०२१ पर्यंत करता येईल.

जेव्हा समस्या अभूतपूर्व आणि विलक्षण असतात तेव्हा त्यावरील उपाययोजना देखील अभूतपूर्व असणे गरजेचे असते. गेल्या वर्षी कोविड-१९ महामारीची सुरुवात झाल्यापासून एलएसएटी-इंडिया परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स-असिस्टेड रिमोट प्रॉक्टरिंगचा वापर करून परीक्षेत प्रामाणिकपणा आणि वैधता यांचे पुरेपूर पालन केले जात आहे यावर लक्ष ठेवले जाते. या पद्धतीमुळे विद्यार्थी त्यांच्या घरून अगदी सुरक्षित आणि सोयीस्करपणे परीक्षा देऊ शकतात आणि विधी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियांमध्ये काहीही व्यत्यय येत नाही.

एलएसएसीचे उपाध्यक्ष युसूफ अब्दुल-करीम यांनी सांगितले की,  आम्हाला ठाऊक आहे परीक्षेची तारीख अलीकडे घेतल्याने विद्यार्थ्यांचा तयारीसाठी उपलब्ध असलेला वेळ कमी झाला आहे.  पण त्यांना परीक्षेची तयारी करण्यात मदत करणारी ऑनलाईन टूल्स आम्ही उपलब्ध करवून दिलेली आहेत.

भारतातील अनेक मोठी विधी महाविद्यालयांमध्ये एलएसएटी – इंडिया ही परीक्षा त्यांच्या विधी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा मानली जाते.  एलएसएटी – इंडिया या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना फक्त एक परीक्षा देऊन भारतातील अनेक मोठ्या विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येतात.  त्यामुळे जास्तीत जास्त संधींचा लाभ घेऊन, वेळ, ताण आणि पैसे यांची बचत करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एलएसएटी – इंडिया अतिशय उपयुक्त आणि सोयीस्कर आहे.  एलएसएटी – इंडिया हा प्रवेशाच्या प्रमुख निकषांपैकी एक असल्याचे ज्यांनी स्वीकारले आहे अशा महाविद्यालयांची यादी पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा – https://www.discoverlaw.in/associated-law-college.

विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यात मदत पुरवण्यासाठी एलएसएसी ग्लोबलने एलएसएसी लॉप्रेप हा डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म सुरु केला आहे.  याठिकाणी विद्यार्थी विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीच्या स्पर्धा  परीक्षेसाठी तयारी करू शकतात. एलएसएसी लॉप्रेप मध्ये सराव परीक्षांची खूप मोठी लायब्ररी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना एलएसएटी-इंडियाच्या प्रत्यक्ष परीक्षेचा अधिक जास्त अनुभव मिळवता येतो आणि डिजिटल इंटरफेसची चांगली ओळख करून घेता येते.  ७० वर्षांपेक्षा दीर्घ काळ केलेल्या टेस्टिंग रिसर्च आणि अनुभवाच्या आधारे एलएसएसी लॉप्रेप विद्यार्थ्यांमध्ये अत्यावश्यक समीक्षात्मक आणि विश्लेषक विचार कौशल्ये विकसित करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.  विधी शिक्षणासाठी ही कौशल्ये विद्यार्थ्यांकडे असणे खूप गरजेचे आहे.

एलएसएसी लॉप्रेप आणि एलएसएटी – इंडियाबद्दल अधिक माहितीसाठी कृपया डिस्कव्हर लॉ इंडिया वेबसाईटला भेट द्या.  डिस्कव्हर लॉ वेबसाईटवरून मोफत डाउनलोड करण्याजोगे साहित्य वापरून या परीक्षेची तयारी करता येईल किंवा आम्हाला discoverlawindia@LSAC.org वर ई-मेल पाठवा.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading