fbpx
Monday, June 17, 2024
TECHNOLOGY

ओप्पो ए ५३एस ५जी: भारतातील सर्वात किफायतशीर ५जी फोन

स्मार्ट डिव्हायसेसचा आघाडीचा जागतिक ब्रँड ओप्पोने आपला नवीन ओप्पो ए५३एस ५जी स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल केला आहे. सहज परवडण्याजोग्या किमतींच्या फोन्सच्या श्रेणीतील हा सर्वात स्लीक आणि सर्वात किफायतशीर ५जी फोन आहे. ८ जीबी मेमरी असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेकचा डिमेन्सिटी ७०० चिपसेट आहे. “बिग ऑन मेमरीहाय ऑन स्पीड” अर्थात प्रचंड मेमरी आणि प्रचंड वेग हे वैशिष्ट्य असलेल्या ओप्पोच्या ए सीरिज फोन्सच्या चाहत्यांकडे ओप्पो ए५३एस ५जी फोन असायलाच हवा. ओप्पो ए५३एस ५जी फोनची किंमत फक्त १४,९९० रुपयांपासून सुरु होते.

अत्याधुनिक, भविष्यवेधी तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी ओप्पो वचनबद्ध आहे.  याच दिशेने वाटचाल करत गेल्या काही महिन्यात ओप्पोने वेगवेगळ्या किंमत श्रेणीत वेगवेगळे ५जी फोन सादर केले आहेत.  प्रीमियम श्रेणीमध्ये ओप्पो रेनो५ प्रो ५जी, एफ१९ प्रो+ ५जी तर परवडण्याजोग्या किमतींच्या श्रेणीमध्ये ओप्पो ए७४ ५जी आणि आता नवा ओप्पो ए५३एस ५जी अशी ओप्पोची आगेकूच सुरु आहे.  ए सीरिज युजर्सना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरायला मिळते इतकेच नव्हे तर, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांना आपल्या जीवनात अनेक लाभ अनुभवता येतात.  दर्जेदार, दमदार कामगिरी, दीर्घकाळपर्यंत टिकून राहणारी बॅटरी, सुरेख डिस्प्ले आणि फॅशनेबल डिझाईन या सर्वांचा मेळ असल्यामुळे ए सीरिज फोन्स भरपूर मूल्य तर देतात शिवाय युजर्सना आपल्या जीवनात अनेक सुधारणा घडवून आणण्यात देखील मदत करतात.

ओप्पो इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर  दमयंत सिंग खानोरिया यांनी सांगितले, “नवीन ओप्पो ए५३एस ५जी फोन आणून आमच्या ए सीरिजमध्ये आणखी एक नवा ५जी फोन सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  या फोनमध्ये अनेक अशी शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे हा फोन संपूर्ण दिवसभर वापरता येतो, शिवाय हा ५जी नेटवर्कसाठी सज्ज आहे, भरपूर स्टोरेजचे लाभ मिळवून देतो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या मनोरंजनाचा आनंद घेत असता तेव्हा हा फोन त्यामध्ये जराही व्यत्यय येऊ देत नाही.”

कोणत्याही स्मार्टफोनसोबत अखंडित नेटवर्क कनेक्टिविटी असणे अत्यावश्यक असते, युजर्सना स्मार्टफोनचा अनुभव कसा व किती मिळणार हे त्यावर अवलंबून असते. ओप्पो ए५३एस ५जी फोनमध्ये मीडियाटेकची डिमेन्सिटी ७०० चिपवर चालणारे ड्युएल सिम ५जी असल्यामुळे सर्वाधिक वेगवान ५जी नेटवर्क कनेक्शनसाठी हा फोन अगदी अनुरूप आहे.  या फोनचे लाभ एवढ्यावरच थांबत नाहीत.  ड्युएल सिम ड्युएल स्टॅन्डबाय (५जी) मुळे तुम्ही यामध्ये दोन ५जी सिम कार्ड्स वापरू शकता.  ओप्पो ए५३एस ५जीमधील ५जी क्षमतांमुळे काही अतिरिक्त लाभ अनुभवता येतात.  या फोनसोबत तुम्हाला स्थिर नेटवर्क मिळते, ३६० अंश अँटेना तंत्रज्ञान चार एम्बेडेड अँटेना वापरत असल्याने ड्रॉप्ड कनेक्शन्सचा त्रास सहन करावा लागत नाही.  तुमचा फोन कसाही धरलेला असेल तरी फोनमध्ये सिग्नल असणारच.  ओप्पो ए५३एस ५जी तुमचे कनेक्शन जराही कमी होऊ देत नाही, यातील लिंकबूस्ट तुमचा फोन वाय-फाय आणि ५जी सिग्नल या दोघांनाही कनेक्ट करतो, त्यामुळे तुम्हाला तुमची भरपूर कामे काहीही व्यत्यय न येता करता येतात.  स्मार्ट ५जी ऑटोमॅटिक स्विचमुळे ५जी ते ४जी/एलटीई कनेक्शन यामध्ये आपोआप स्विच करते तर स्मार्ट ५जी ऑटोमॅटिक शेड्यूलिंगमुळे तुमच्या ऍपसाठी सर्वोत्तम नेटवर्क कॉन्फिगरेशननुसार नेटवर्क्स स्विच करू शकते, त्यामुळे तुमचे कनेक्शन अचानक बंद होत नाही आणि फोनची बॅटरी संपण्याची देखील चिंता करावी लागत नाही.

ओप्पो ए५३एस ५जी फोन संपूर्ण दिवसभर तुमची पुरेपूर साथ देतो. त्यासोबत आम्ही या फोनमध्ये स्टोरेज आणि मेमरीकडे देखील नीट लक्ष पुरवले आहे.  अल्ट्रा-लार्ज अर्थात प्रचंड मेमरी व स्टोरेज हे या फोनचे वैशिष्ट्य आहे.  मायक्रो एसडी स्लॉटमार्फत या फोनमध्ये १२८जीबी स्टोरेजचा अनुभव घेता येतो.  मेमरीमध्ये ६जीबी आणि ८जीबी असे दोन पर्याय आहेत.  ओप्पोची रॅम विस्तार सुविधा या फोनमध्ये देखील आहे, यामुळे फ्रेम लॉस, फ्रॅगमेंटेशन डेटा रीडिंगमध्ये उशीर यांच्या शक्यता कमी होतात आणि युजर्सना दीर्घकाळपर्यंत फोनच्या सर्व वैशिष्ट्यांचा अनुभव सुरळीतपणे घेता येतो.

ओप्पो ए५३एस ५जीची बॅटरी क्षमता तब्बल ५००० एमएएच एवढी प्रचंड असल्यामुळे एक दिवसापेक्षा सुद्धा जास्त काळ बॅटरी टिकून राहते.  याच्या आधीच्या फोन्सपेक्षा ओप्पो ए५३एस ५जी तीन तास जास्त वेळ वापरता येतो, ३७.८ तास टॉक टाइम, १७.७ तास व्हिडिओ प्लेबॅक यामध्ये मिळतो.  याशिवाय यामध्ये सुपर पॉवर सेव्हिंग मोड आहे, सीपीयू फ्रिक्वेन्सी आणि स्क्रीनचा ब्राईटनेस ऍडजस्ट करून फोनच्या बॅटरीचे वापराचे प्रमाण कमी केले जाऊ शकते, यामुळे फोनची बॅटरी कमी असताना देखील तुम्हाला तुमचे मेसेजिंग पूर्ण करता येते किंवा टॅक्सीसारखी सुविधा

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading