fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

कामगारदिनी चिंचवडेनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पिंपरी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताची मोठी कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज ओळखून सचिनदादा चिंचवडे युथ फाऊंडेशन पिंपरी चिंचवड, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड, जय गुरुदत्त मित्र मंडळ चिंचवडेनगर, क्षत्रिय माळी समाज सुधारक संस्था पिंपरी चिंचवड, श्री सद्गुरू बाळुमामा बहुउद्देशीय संस्था चिंचवडेनगर, यशवंत फाउंडेशन संभाजीनगर या संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर येत्या 1 मे रोजी कामगारदिनी सकाळी 10 वाजता नगरसेवक सचिन चिंचवडे यांचे जनसंपर्क कार्यालय, वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवडेनगर येथे होणार आहे. रक्तदान शिबिरादरम्यान सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सचिन चिंचवडे- 7720847575, लिलाधर मगरे- 9923837854, बंडू मारकड – 9922493330, संतोष पांढरे- 99600 27633, सुनील बनसोडे- 88888 58026, सचिन कोपनर- 91750 07586, संजय कवितके- 79727 39583 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लसीकरणापूर्वी रक्तदान आवश्यक…

देशभरात १ मे पासून १८ वर्षांच्या पुढील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरण झाल्यानंतर पुढचे ६० दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे पुढील दोन तीन महिन्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. रक्ताचा हा तुटवडा टाळण्यासाठी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading