Sunday, June 21, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात आज ६६ हजार ३५८ नवीन रुग्ण; ८९५ जणांचा मृत्यू

मुंबई, दि. २७ – राज्यात सोमवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली होती. पण आज पुन्हा एकदा कोरोनाची तिची स्थिती दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६६ हजार ३५८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ८९५ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख १० हजार ८५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६७ हजार १७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात राज्यातील ६७ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३६ लाख ६९ हजार ५४८ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.२१ टक्क्यांवर पोहोचले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ६२ लाख ५४ हजार ७३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४ लाख १० हजार ८५ (१६.८० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२ लाख ६४ हजार ९३६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३० हजार १४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच अजूनही ६ लाख ७२ हजार ४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात 3871 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 6159 रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात कोरोनाबाधीत 57 रुग्णांचा मृत्यू. 25 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 1368 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 406526
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 45075
  • एकूण मृत्यू – 6611

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 354840

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16650

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading