fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

वंचित विकासतर्फे उपेक्षितांना आधार

पुणे : कोरोना महामारीने रुद्रावतार धारण केल्याने समाजातील उपेक्षित घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन वंचित विकास संस्थेमार्फत लालबत्ती भागातील सर्व मुले, गरजू महिला, वृद्ध महिला, अपंग महिला, ए.आर.टी. पेशंट, टी.जी. यांच्यासह रिक्षाचालकांना रोज नियमित गरम, ताजा आणि पोटभर नाश्ता देण्यात येत आहे. १६ एप्रिल पासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण वस्तीमध्ये जाऊन वंचित विकास संस्थेच्या  कार्यकर्त्या हा नाश्ता देत आहेत. 

या सर्व ठिकाणी महिलांबरोबर नियमित संपर्क आहे. नाश्ता देतानाच मास्क वापर, सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत जागृती केली जात आहे. सध्याच्या बिकट परिस्थितीमुळे, त्याचबरोबर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे येथील काही महिला खचल्या आहेत. त्यांना मानसिक आधार देणे, त्यांचे समुपदेशन करणे हेही संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. संस्थेच्या कार्यकर्त्या तृप्ती फाटक, प्रतिभा शिंदे आणि सुशीला कांबळे संस्थेमार्फत हे काम करत आहेत. सध्या रोज एकूण २५० मुले, महिलांपर्यंत ही मदत पोहोचवली जात आहे. गरज संपेपर्यंत हे काम सुरु राहील, असे वंचित विकास संस्थेने म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading