fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLIFESTYLE

ग्लेनमार्क च्या रियालट्रिस नेझल स्प्रे ला युरोपमध्ये ऍलर्जिक -हिंटायटिस वरचा प्राथमिक उपचार म्हणून मान्यता

मुंबई, दि. २६ – ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड या संशोधनाधारित एकात्मिक औषधनिर्मिती करणा-या कंपनीचे तिच्या एका नव्या नेझल स्प्रे (नाकात फवारण्याचे औषध) साठी युरोपिअन युनिअन मधील १७ देशांत मान्यता मिळविण्याचे प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत.  रियालट्रिस हा कंपनीचा स्प्रे लवकरच ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, जर्मनी, डेन्मार्क, स्पेन, फिनलंड, फ्रांस, आयर्लंड, इटली, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड,रूमानिया, स्लोव्हाकिया, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांत उपलब्ध होणार आहे.  

ग्लेनमार्क काही देशात रियालट्रिस स्वतःच वितरित करील तर काही देशात ( फ्रान्स , इटली, स्पेन आणि बाल्कन प्रदेश) मेनारिनी उद्योगसमूह ग्लेनमार्क बरोबर २०२० मध्ये झालेल्या करारानुसार वितरित करील.  या कराराच्या अटींनुसार ग्लेनमार्क रियालट्रिस साठी मान्यता मिळविणे आणि औषधात सतत सुधारणा घडवून आणणे ही जबाबदारी पार पाडेल, तर संबंधित देशाच्या औषध नियंत्रण विभागाची मान्यता मिळाल्यानंतर या औषधाची शास्त्रीय माहिती प्रसृत करणे आणि प्रत्यक्ष वितरण आणि विक्री करणे ही मेनारिनी ची जबाबदारी असेल.  रियालट्रिस च्या विक्रीचे हक्क मिळवण्यासाठी मेनारिनी  ने ग्लेनमार्क ला आगाऊ रक्कम दिली आहे, आणि भविष्यात या औषधाच्या विक्रीतून मिळणा-या उत्पन्नाचा ठराविक वाटा टप्प्याटप्प्याने ग्लेनमार्क ला मिळेल.  

रियालट्रिस हे ग्लेनमार्क ने विकसित केलेले नवे पूर्वनिश्चित प्रमाणात देण्याचे औषध नाकात फवारण्याच्या स्वरूपात दिले जाते. ऍलर्जिक -हिनटायटिस  (नाक चोंदणे. नाक वाहणे, नाकात खाज येणे, वारंवार शिंका येणे किंवा डोळे चुरचुरणे, लाल होणे अथवा डोळ्यातून पाणी वाहणे ) ची समस्या असलेल्या १२ वर्षे किंवा अधिक वयाच्या व्यक्तीना हे औषध देता येईल. 

अचिन गुप्ता ( ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स च्या युरोप, मध्यपूर्व आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका या देशातील व्यवसायाचे प्रमुख) म्हणाले, “ऍलर्जिक -हिनटायटिस वर अनेक उपचार उपलब्ध असूनही ग्लेनमार्क आपल्या  रियालट्रिस हा पहिला इलाज म्हणून वापरायचा हा स्प्रे युरोपमधील रुग्णांसाठी उत्साहात दाखल करीत आहे. युरोप मधील २५ टक्के लोकांमध्ये ऍलर्जिक -हिनटायटिस ची लक्षणे आढळतात. अशा लोकांना आराम मिळण्यासाठी रियालट्रिस हा एक प्रभावी आणि वापरण्यास सोपा असा इनहेलर स्प्रे खूपच फायद्याचा ठरेल.”   

ग्लेनमार्क ने युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा मध्ये रियालट्रिस चे वितरण – विक्री करण्यासाठी हिकमा फार्मास्युटिकल्स आणि बॉश हेल्थ बरोबर करार केले आहेत. ग्लेनमार्क चे ऑस्ट्रेलियातील भागीदार सेकिरस यांनी २०२० मध्ये रियालट्रिस त्या देशांत सादर केल्यापासून या औषधाचा खप समाधानकारकपणे वाढतआहे. द. आफ्रिका, युक्रेन आणि उजबेकिस्तान येथेही  रियालट्रिस अलीकडेच सादर झाले आहे. ग्लेनमार्क ला आजवर ऑस्ट्रेलिया, द. कोरिया , कम्बोडिया, युक्रेन, उजबेकिस्तान, नामिबिया, रशिया,द.  आफ्रिका आणि इक्वेडोर मध्ये  रियालट्रिस साठी मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता मिळवण्याची प्रक्रिया कॅनडा , ब्राझिल , मलेशिया, सौदी अरबस्तान आणि इतर अनेक देशात सुरु आहे.  ग्लेनमार्क चे चीन मधील भागीदार ग्रँड फार्मास्युटिकल्स या वर्षात या औषधाची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु करणार आहेत.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading