Saturday, May 30, 2026
PUNE

आयुर्वेद, होमिओपॅथी कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी परवानगी द्या-महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने  मागणी

पुणे : कोरोनाच्या दुस-या लाटेत उपचारासाठी बेड, इंजेक्शन आणि आॅक्सिजनचा तुटवडा अशा अनेक अडचणी येत आहेत. आरोग्य व्यवस्थेवर वाढणारा ताण पाहता आरोग्य सेवेत त्वरित काही बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी व इतर उपचार पध्दतीतून कोरोना निर्मूलनासाठी प्रयत्न व्हायला हवेत. या उपचार पध्दतीचे कोविड केअर सेंटर सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महा एनजीओ फेडरेशनतर्फे निवेदन देण्यात आले आहे. 

आयुर्वेद, होमिओपॅथी व इतर उपचार पध्दतीचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी राज्याचे राज्यपाल, उपमुख्यमंत्री,आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व आयुक्त महानगर पालिका, नगर परिषद, महापौर / नगरअध्यक्ष तसेच संबधित मंत्रालयाचे सर्व विभाग यांना देखील यासंबंंधी निवेदन देण्यात आले आहे. 
फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले,आपण सर्वच कोरोना नावाच्या भयाण संकटला सामोरे जात आहोत. या विषयी सुरू असलेल्या उपचार पद्धतीमधे सामान्य नागरिक यांना न परवडणारी बिल रुग्णालयात भरावी लागत आहे. बेड, आॅक्सिजन साठा देखील कमी पडत आहे. यामुळे आम्ही आयुर्वेदिक, होमिओपॅथी कोवीड सेंटर ची मागणी करत आहोत. जेणे करून कमी खर्चात आजारी व्यक्तींना योग्य उपचार मिळेल व उपचार दरम्यान होणारी धावपळ थांबेल. रेमिडिसिवीर व अन्य इंजेक्शनचा तुडवडा खूप असून त्याचा काळाबाजार रोखणे गरजेचे असल्याची मागणी आम्ही करीत आहोत. 

फेडरेशनचे सहसंस्थापक विजय वरुडकर म्हणाले, आयुर्वेद, होमिओपॅथी व इतर उपचार पध्दतीमधील डॉक्टर, शास्त्रज्ञ यांना कोरोना विषयी संशोधन करण्याची परवानगी देण्यात यावी.  तसेच त्यांना अपेक्षित सहकार्य सरकार द्वारे करण्यात यावे. आयुर्वेद, होमिओपॅथी व इतर उपचार पध्दतीत कोरोनावर सुचवलेल्या औषधांचा सकारात्मक विचार करून त्या विषयी योग्य ती चाचणी करण्यात यावी. कोरोना निर्मुलनासाठी सर्व विषयातील आरोग्य तज्ञाच्या सूचना एकत्रित येऊन योग्य ती आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
महा एनजीओ फेडरेशन हा सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांच्या सक्षमतेसाठी काम करणारा समूह आहे. आज पर्यंत आम्ही २ हजार पेक्षा अधिक सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून १५० पेक्षा अधिक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात हे कार्य सुरु असून कोविड काळात देखील अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading