Saturday, May 30, 2026
TECHNOLOGY

ओप्पो A54 भारतात दाखल

पुणे, दि. २२ – स्मार्ट डिव्हायसेसचा,  जागतिक पातळीवरील आघाडीचा ब्रँड ओप्पोने नवा ओप्पो ए५४ भारतात दाखल करत असल्याची घोषणा आज केली आहे. याची किंमत १३,४९० रुपयांपासून पुढे आहे.आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा, आपली पक्की साथसोबत करू शकेल असा आणि तरीही आकर्षक डिझाईन व उच्च कामगिरी यांचा पुरेपूर मिलाप असलेला स्मार्टफोन हवा असणाऱ्या ग्राहकांसाठी ओप्पो ए५४ अगदी योग्य आहे. ५००० एमएएच बॅटरी आणि १८ वॅट वेगवान चार्जिंग असल्यामुळे ओप्पो ए५४ संपूर्ण दिवसभर तुम्हाला जशी हवी तशी साथ देतो. ऑक्टा-कोअर प्रोसेसर, १२८ जीबी रॉम इतकी महाप्रचंड मेमरी क्षमता आणि भव्य १६.५५ सेमी पंच-होल डिस्प्ले असल्यामुळे तुम्ही या स्मार्टफोनवर मनोरंजनाचा मनोसोक्त आस्वाद घेऊ शकता.    

तंत्रज्ञान अधिक जास्त मजेशीर बनावे या उद्देशाने ही सीरिज तयार करण्यात आली आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या युजर्ससाठी तंत्रज्ञान म्हणजे त्याच्या लाभांचा आनंद घेणे, ज्यामुळे त्यांना सामाजिकदृष्ट्या सक्रिय जीवनशैली जगता येते. अत्याधुनिक, नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी ते उत्सुक आहेत आणि तरीही त्यांचा दृष्टीकोन मात्र व्यावहारिक आहे, नुसत्या दिसायला आकर्षक पण अनावश्यक गोष्टी त्यांना अजिबात नको असतात. ए५४ मध्ये स्टाईल आणि आधुनिक डिझाईन यांचा उत्तम मेळ आहे, त्यामुळे युजर्सना कोणत्याही बाधा न येता, आपल्या आयुष्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेता येतो.

ओप्पो इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर दमयंत सिंग खानोरिया यांनी सांगितले, आमच्या युजर्सच्या जीवनशैलीमध्ये अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी किंवा त्यांच्या जीवनशैलीला अनुरूप असा स्मार्टफोन देण्यासाठी ए सीरिज डिझाईन करण्यात आली.  उच्च कामगिरी आणि आधुनिक डिझाईन यांचा सुवर्णमध्य ए५४ मध्ये असल्याने आमचा हा उद्देश पूर्ण झाला आहे. तब्बल ५००० एमएएच  इतकी प्रचंड बॅटरी आणि १८वॅट फास्ट चार्ज असल्याने तुम्ही संपूर्ण दिवसभर अगदी मनोसोक्तपणे याचा वापर करू शकता.  ए५४ मध्ये तुम्हाला स्टोरेज आणि मेमरी देखील भरपूर मिळते. केवळ स्मार्टफोन अकार्यक्षम आहे म्हणून येणारा वैताग ए५४ च्या युजर्सना अजिबात सहन करावा लागणार नाही, मनाप्रमाणे सर्व मनोरंजनाचा भरपूर आनंद घेता येईल. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading