fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कॅटलिस्ट फाउंडेशन कडून गरजू विद्यार्थांना शैक्षणिक मदत

पुणे – डॉ. आंबेडकर जयंतीला जाहिरात आणि फलक न लावता ही रक्कम गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून देण्याचा अनोखा उपक्रम कॅटॅलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी राबवला. औंध रोड येथील युवा शक्ती या गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करणाऱ्या संस्थेस फाउंडेशन मार्फत 10 हजारांची मदत करण्यात आली.

यावेळी बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुलांच्या आरोग्याच्या कारणात्सव सध्या शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून व्हर्चुअल पद्धतीने शाळेचे वर्ग सुरु आहेत. मात्र या मुळे विद्यार्थांची बौद्धिक प्रगती खुंटली आहे. अशा परिस्थितीत औंधरोड आंबेडकर नगर येथील रोहित आगळे आणि त्यांचे सहकारी युवा शक्तीच्या माध्यमातून विद्यार्थांचे शैक्षणिक आणि बौद्धिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त आगळे यांच्या संस्थेला गरीब विद्यार्थ्यांच्या पुस्तकांसाठी कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत 10 हजार रुपयांची मदत आम्ही केली. कोरोना संबंधी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करत युवा शक्ती ही संस्था मुलांसाठी मोफत शिकवणी घेत आहेत येथे ते विद्यार्थांना शैक्षणिक उपक्रमांसोबत, विविध स्पर्धा, शैक्षणिक सहल, विविध वैज्ञानिक प्रयोग यांसारखे उपक्रम राबवत आहेत. याचा विद्यार्थांना फायदा होऊन यामुळे त्यांची बौद्धिक प्रगती होत आहे.

सुनील माने यांचे आभार मानताना आगळे म्हणाले, गेल्या तीन वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत मात्र कोरोना काळात याचा विद्यार्थांना फार फायदा झाला. व्हर्चुअल क्लासरुममुळे विद्यार्थांना डोळ्यांचे आजार वाढले तसेच त्यांची एकाग्रता कमी झाली. कोरोना नियमांचे पालन करत आम्ही विद्यार्थांना ज्ञानदान करत असल्याने आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद विद्यार्थी तसेच पालकांकडून मिळाला.आज आमच्याकडे जवळपास 100 विद्यार्थी शिकत आहेत. आम्ही हे काम मोफत करत असल्याने सुनील माने यांच्यासारख्या समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन आम्हाला मदत केल्यास आमचा उत्साह आणखी वाढेल तसेच अनेक गरीब विद्यार्थांना याचा फायदा होईल.
या कार्यक्रमाला कॅटलिस्ट फाउंडेशनच्या सचिव लक्ष्मीकांता माने, भाजप युवा मोर्चा शिवाजीनगर मतदार संघाचे सरचिटणीस रोहित भिसे, सुनील दैठणकर, जितेंद्र गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, अनिल माने, सिद्धांत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading