fbpx
Monday, June 17, 2024
NATIONALTOP NEWS

कोरोना – देशात 24 तासांत तब्बल 96 हजार 982 नवीन रुग्ण

नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असतानाच देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. देशात मागील 24 तासांत तब्बल 96,982 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 446 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,26,86,049 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,65,547 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 50,143 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,17,32,279 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 7,88,223 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, 2020 साली भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉक काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही सध्या मोठी वाढ झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading