Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENT

स्नायपर – लव अटॅक लॉन्च

हंगामा ही भारताची अग्रगण्य डिजीटल कंपनी असून त्यांनी आज स्नायपर – लव अटॅक या नवीन अॅक्शन गेमचे लॉन्च केले. हा गेम शान याच्या ‘स्नायपर’ सुपरहिट गाण्यावर आधारित आहे. हा गेम या गाण्याच्या यशाचा जल्लोष साजरा करणार असून म्युझिक व्हीडीओत शान’ने रंगवलेल्या डॉनची व्यक्तिरेखा अॅनीमेटेड अवतारात सादर करण्यात येईल. या गेममध्ये निरनिराळ्या लेव्हल असून हा डॉन आपल्या शत्रूंचा समाचार घेईल. गेमचे कंट्रोल अगदी सुलभ आहेत, खेळाचे कथासूत्र गुंतवून ठेवणारे आहे, त्याचप्रमाणे इंटरफेस वापरायला सोपा असून लघु आणि दीर्घ स्वरुपाची सेशन खेळू इच्छिणाऱ्यांकरिता मनोरंजक ठरणार आहे. या खेळाचे उपभोक्ते शानच्या रुपात खेळाची सुरुवात करतील आणि प्रत्येक लेव्हलगणिक खेळाच्या जटीलतेचा अनुभव घेतील. हा गेम हंगामा गेम्सझोन https://bit.ly/39tM9wmया एचटीएमएल5 आधारीत गेमिंग पोर्टलवर उपलब्ध असून या मंचावर स्पोर्ट्स, आर्केड, अॅक्शन, अॅडव्हेंचर, स्ट्रॅटजी आणि पझल अशी विविध प्रकारची वर्गवारी समाविष्ट आहे.

या गाण्याचाoriginal music video, स्नायपरमध्ये गायक शान हा डॉनच्या भूमिकेत झळकणार असून सोनाली राऊत ही गुप्त मारेकरी रंगवताना दिसते. या गाण्यात शानच्या यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवताराची झलक पाहायला मिळते. नवीन दमाची संगीत निर्मिती, कडक गायकी आणि पंजाबी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेतील ठेका धरायला लावणाऱ्या गाण्याच्या ओळींमुळे हे सादरीकरण जबरदस्त झाले. शानने गायक आणि संगीत संयोजकाची भूमिका बजावली आहे. तर कुंवर जुनेजा याने गीत लिहिले आहे. या म्युझिक व्हीडियोचे दिग्दर्शन एमजी मेहुल गडानी याने केले आहे.

या गेमबद्दल बोलताना हंगामा डिजीटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले की, “गेमिंग इंडस्ट्रीमध्ये कॅज्युअल गेमिंगची वर्गवारी वेगाने वाढते आहे आणि आगामी 2 वर्षांत कॅज्युअल गेमर्सची संख्या अंदाजे 35%ने वाढण्याचा अंदाज आम्ही व्यक्त करतो. हंगामा गेम्सझोनच्या माध्यमातून गेम्सचे वैविध्यपूर्ण प्रकार आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. याचा इंटरफेस सुलभ आहे, या फॉरमॅटमध्ये गुंतवून ठेवणारा आहे. शानसोबत काम करताना आम्हाला आनंद वाटतो. हा आपल्या देशाचा सर्वात प्रतिभावंत कलाकार आहे. जो आपल्या चाहत्यांना त्याच्या ट्रॅकच्या स्वरुपात मनोरंजक खेळाचा अनुभव घेऊन आला आहे.”

याविषयी आपले विचार मांडताना शान म्हणतो, “माझ्याकरिता स्नायपर हा अतिशय विशेष ट्रॅक ठरला आहे. मला स्वत:चा नव्याने शोध लागला, माझे हे प्रस्तुत व्हर्जन चाहत्यांनी पूर्वी कधीही पाहिलेले नाही. एका गेम आधारित ट्रॅकवर हंगामासोबत काम करण्याचा अनुभव धमाल होता. या गाण्याची मजा घेण्याकरिता माझ्या चाहत्यांना आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे. गेममधील माझा डिजीटल अवतार पाहणे माझ्या दृष्टीने उत्साहवर्धक होते आणि मला जितकी गंमत वाटली, तितकीच धमाल उपभोकत्यांना नक्की वाटेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading