fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

महामानव विधायक जयंती महोत्सव – सिद्धार्थ मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे – महापुरुषांचे आदर्श विचार समाजात रुजवत असताना जयंती उत्सवाच्या सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देत रक्तदान शिबिराचा अभिनव उपक्रम येरवड्यातील सिद्धार्थ मित्र मंडळाच्यावतीने नुकताच राबविण्यात आला.महामानव विधायक जयंती महोत्सव अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज ,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त ससून रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ससून रक्तपेढीच्या डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांचा मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक उत्सवांवर बंदी घातलेली आहे. त्यातच पुणे शहरासह संपूर्ण राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ मित्र मंडळाने सर्व कार्यक्रम रद्द करून रक्तदान शिबिराचा अभिनव उपक्रम राबवला. या रक्तदान शिबिरात पासष्ठ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
सामाजिक अंतर राखून तसेच सॅनिटायझरचा योग्य पध्दतीने वापर करून शिस्तबद्ध पद्धतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला नगरसेवक अविनाश साळवे,शैलेश राजगुरू ,नितीन राजगुरू ,भूषण जाधव, अजय जानराव,उद्योजक साईराम सातव आदी मान्यवर तसेच मंडळाचे मार्गदर्शक निखिलभाऊ गायकवाड, जमीलभाई सय्यद उपस्थित होते.ससून रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. प्रियांका कदम ,समाजसेवा अधीक्षक अरुण बर्डे ,डॉ. शुभांगी रत्नावत, डॉ. अनुजा मुल,तंत्रज्ञ श्यामसुंदर चाटे, स्टाफ नर्स आशा वाघ, सहाय्यक संभाजी शिंदे,मरिअप्पा देवर तसेच सिद्धार्थ मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. ससून रक्तपेढीच्या डॉक्टर, तंत्रज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी यांचा यावेळी सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सिद्धार्थ मंडळाच्यावतीने राबवण्यात आलेल्या या विधायक उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading