हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे आणि संभाजी राळे यांना प्रभात शौर्य पुरस्कार जाहीर

पुणे : शिवजयंतीनिमित्त गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळतर्फे देण्यात येणारा प्रभात शौर्य पुरस्कार हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे आणि संभाजी राळे यांना जाहीर झाला आहे. देशसेवा बजावताना दोन्ही सैनिकांना वीरमरण आले. त्यामुळे त्यांना मरणोत्तर प्रभात शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. दोन्ही जवानांच्यावतीने त्यांचे कुटुंंबीय हा पुरस्कार स्विकारणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी दिली.

शिवजयंती उत्सवांतर्गत गुरुवार पेठेतील कृष्णहट्टी चौकात शिवसूर्य स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. भाजपा पुणे शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष स्वरदा बापट, नगरसेवक सम्राट थोरात, मंडळाचे उदय वाडेकर, अविनाश निरगुडे, रवींद्र भन्साळी, सचिन भोसले, संदीप नाकील, सोन्या शेलार, ओमकार नाईक, अक्षय चौहान, गौरव मळेकर, कृष्णा परदेशी, शिवराज बलकवडे यावेळी उपस्थित होते. यंदा उत्सवाचे ३७ वे वर्ष आहे. 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी अपंग सैनिक के.पी सुनिल, अंधांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल देशमुख, सैनिकांसाठी कार्य करणारे अशोक मेहंदळे, हुतात्मा सौरभ फराटे, हुतात्मा मेजर प्रफुल्ल मोहरकर, हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे आणि हुतात्मा मेजर शशिधरन नायर (त्यांच्या वतीने कुटुंबियांनी पुरस्कार स्विकारला) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

ऋषिकेश जोंधळे हे २०१८ मध्ये सैन्यदलात भरती झाले होते. १३ नोव्हेंबर २०२० रोजी गुरेज सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाºया पाकिस्तानी लष्कराला जोरदार प्रत्युत्तर देताना जोंधळे यांना वीरमरण आले. संभाजी राळे हे २८ सप्टेंबर २०२१ रोजी सैन्यदलात भरती झाले. त्यांनी जम्मूकाश्मीर, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश व आसाम येथे देशसेवा बजावली. तेजपूर येथे देशसेवा करीत असताना त्यांना वीरमरण आले. 

किशोर चव्हाण म्हणाले, तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रभावना निर्माण व्हावी, या मूळहेतूने स्थापन केलेल्या प्रभात मित्र मंडळातर्फे दरवर्षी भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. शिवराय मनामनात…शिवजयंती घराघरात, पुनश्च कोरोना जनजागृती अभियान, कोरोना योद्धा कृतज्ञता सन्मान सोहळा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: