Thursday, September 3, 2026
PUNE

मुख्यमंत्री सहायता निधीस मुकूंद भवन ट्रस्टच्यावतीने 50 लाख

पुणे, दि.1 :- कोविड-19 रुग्णांवर वैद्यकीय औषधोपचार करण्यासाठी मुकुंद भवन ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते व मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी आदित्य लोहिया, मदन जैन, डॉ.शैलेश गुजर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading