‘नोबडी’ चित्रपटगृहांमध्ये ९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार
एनबीसीयुनिव्हर्सलने आज कोविड-१९ महामारीनंतर २०२१ मधील त्यांचा पहिला चित्रपट ‘नोबडी’ चित्रपटागृहांमध्ये प्रदर्शित होण्याच्या तारखेची घोषणा केली. बहुप्रतिक्षित अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ९ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. इल्या नैशुलर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘नोबडी’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटामध्ये एम्मी पुरस्कार विजेत्या बॉब ओडेनकिर्कने (बेटर कॉल साउल, दि पोस्ट, नब्रास्का) कमी लेखण्यासोबत दुर्लक्ष करण्यात आलेले वडिल व पती हच मॅन्सेलची भूमिका साकारली आहे. तो त्याच्या जीवनात होत असलेल्या अपमानांना सहन करतो आणि कधीच त्याचे प्रत्युत्तर देत नाही. डेरेक कोलस्टाड यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे, ज्यांनी यापूर्वी ‘दि जॉन विक सिरीज’, ‘दि फाल्कन’ आणि ‘दि विंटर सोल्जर’ अशा विविध समीक्षकांनी व व्यावसायिकदृष्ट्या वाखाणलेल्या चित्रपटांचे लेखन केले आहे. हा २०२१ मधील सर्वात मोठ्या अॅक्शन चित्रपटांपैकी एक असणार आहे.
एनबीसीयुनिव्हर्सलने नुकतेच मागील सुपरबॉलदरम्यान चित्रपटाचा खास ट्रेलर देखील सादर केला होता. या ट्रेलरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाबाबत उत्सुकता देखील वाढली. मीडियामध्ये चर्चा सुरू आहे की प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. भारतातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट इंग्रजी भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात येईल, सोबतच हिंदीमध्ये डब देखील करण्यात येईल. ‘नोबडी’ चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चित्रपटाबाबत चर्चा केली जात आहे.
‘नोबडी’ ही तटस्थपणे उभा राहून मौजमजा पाहणा-या हचची कथा आहे. तो पुरूषांची एक टोळी छळ करत असलेल्या महिलेला मदत करण्यासाठी त्यामध्ये हस्तक्षेप करतो आणि शेवटी सूड घेणा-या ड्रम माफियाचा लक्ष्य बनतो. एके रात्री दोन चोर त्याच्या घरामध्ये येतात, हच त्याचे स्वत:चे व त्याच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यामध्ये असमर्थ ठरतो. त्याचा किशोरवयीन मुलगा ब्लेक (गेज म्यूनरो, दि शॅक) त्याच्यावर नाराज होतो आणि त्याची पत्नी बीका (कोनी निल्सेन, वंडर वुमन) त्याचा खूपच पाणउतारा करते.
यंदा ९ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये सिनेमॅटिक मास्टरक्लासमधील अॅक्शन पाहण्याचा आनंद घ्या, जे चुकवण्याची कोणाचीच इच्छा नसेल. चित्रपट चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
