आता रॉजर फेडररच्या नजरेतून स्वित्झर्लंड अनुभवता येणार

गेली अनेक वर्षे आपल्या गुणवत्तापूर्ण खेळाने तसेच अतिशय नम्र स्वभावाने स्वित्झर्लंडचे सकारात्मकतेने नेतृत्व करणारा रॉजर फेडरर आता स्वित्झर्लंड या नयनरम्य देशाचा अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. या गुणी खेळाडूने स्वित्झर्लंड टुरिझम (एसटी) करिता स्वीस  नॅशनल टुरिझम बोर्डसाठी दीर्घकालीन सहकार्यात प्रवेश केला. एकसमान उद्दिष्ट: त्याच्या उर्जावान निसर्गाने पाहुण्यांना स्वित्झर्लंडला भेट देण्यासाठी आकर्षित करणे.

रॉजर फेडरर आणि स्वित्झर्लंड टुरिझम (एसटी) एकत्र मिळून जगभरात स्वित्झर्लंडचा प्रसार करणारे उपक्रम राबविणार आहेत. सध्या पाठबळाची मोठी गरज आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर उत्पन्न झालेल्या सर्वात मोठ्या समस्येचा मुकाबला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वीस झेंडा गौरवाने मिरवणारी रॉजरहून अन्य कोणतीच व्यक्ती असू शकत नाही, असे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले. “ही एक परफेक्ट मॅच आहे, कारण स्वित्झर्लंड आणि त्याच्या धुंद करणाऱ्या सौंदर्याने रॉजर’च्या अभूतपूर्व कारकीर्दीत मोठी भर घातली आहे” असे एसटी’चे सीईओ मार्टीन नायडेगर यांनी सांगितले. “मी जेव्हा कोर्टवर पाऊल ठेवतो, त्यावेळी मी स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करत असतो असे कायमच मला वाटते. माझे नाव उच्चारल्यावर, बाजूला स्वित्झर्लंडचा झेंडा असतो. गेली 22 वर्षे टूरवर असताना मनात अभिमान दाटून येतो आणि हे अविरत असेच चालत राहणार. एसटी’सोबत एकत्र येण्याचा निर्णय माझ्या दृष्टीने तर्कसंगत पाऊल आहे” असे नायडेगर यांच्या समवेत झालेल्या संभाषणात रॉजर फेडरर याने नमूद केले. ही दीर्घकालीन भागीदारी सुरू करण्याच्या दृष्टीने दोघेही उत्सुक आहेत.

निसर्गाने उर्जाक्षम होणे 

एप्रिल महिन्यापासून संभाषणाच्या हालचाली सुरू होणार आहेत. या दरम्यान युएसए आणि एशिया पॅसिफिक, विशेषतः भारतानंतर युरोपियन शहरांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. रॉजर फेडरर हा स्वीस  निसर्गातून उर्जा कमावतो असे दर्शवणाऱ्या दृश्य आणि शॉर्ट क्लिपची मालिका प्रदर्शित करण्यात येणार आहे. MySwitzerland.com वर पाहुण्यांना रॉजरच्या नजरेतून स्वित्झर्लंड टिपण्याची संधी मिळेल. तो त्यांची आवडती ठिकाणे, प्रमुख स्वीस आकर्षण स्थळांसोबतच यापूर्वी न पाहिलेले स्थलदर्शन घडवून आणेल. “मी जगभर प्रवास केला. मात्र स्वित्झर्लंड हेच माझे सर्वात आवडते ठिकाण आहे. मी प्रवासात असताना माझ्या देशाची फार आठवण येते” अशा शब्दांत फेडरर स्वत:चे गुपित उघड करतो.

मंच सज्ज आहे

“स्वित्झर्लंड टुरिझम आणि रॉजर फेडरर यांचे अगणित नीतीमूल्य आहेत. त्यांचा संगम घडवणे या अभिनव संधीने शक्य करून दाखवले आहे. माझ्याकरिता हे फार महत्त्वाचे आहे. मागील काही महिन्यांनी जी

आव्हाने दाखवली, त्यातून सावरत स्वत:चे वेगळेपण सिद्ध करणे आणि त्या पलीकडे असंख्य घडामोडींचा हा प्रवास रंजक ठरेल,” नायडेगर ठामपणे सांगतात. आपल्या मायभूमीचे समर्थन करण्यासाठी रॉजर फेडरर अतिशय जोशात आहे. तसेच हे काम तो सेवाभावी वृत्तीपायी करतो आहे. रॉजर फेडरर एसटी’चा नवीन राजदूत झाला असून त्याच्या सहभागाकरिता एक रक्कम रॉजर फेडरर फाउंडेशनला दान करण्यात येईल. स्वित्झर्लंड’मधील गरीब बालकांना साह्य करण्याचे कार्य ही संस्था करते. मंच सज्ज झाला आहे – स्वित्झर्लंड टुरिझम आणि रॉजर अधिकृतपणे भागीदार होण्यासाठी तयार आहेत.  

Leave a Reply

%d bloggers like this: