कोरोना – राज्यात शुक्रवारी उच्चांकी ३६ हजार ९०२ नवीन रुग्ण

मुंबई, दि. २६ – महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळतो आहे. आज राज्यात कोरोनाचे ३६ हजार ९०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. 

कधीकाळी ३६ हजार ही संख्या अख्ख्या देशभरातील नव्या कोरोनाग्रस्तांची असायची. मात्र आता ती एकट्या महाराष्ट्रात नोंदवली जाऊ लागली आहे. कोरोनाची हीच परिस्थिती लक्षात घेता, राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच सणांच्या पार्श्वभूमीवरही अनेक ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

पुणे शहर ..!

  • दिवसभरात 3594 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 2165 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 24 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
    251223
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-29983
  • एकूण मृत्यू – 5161
  • एकूण डिस्चार्ज- 216079

Leave a Reply

%d bloggers like this: